Aaditya Thackeray on Sanjay Raut: काळजी घे संजय काका! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास पोस्ट; म्हणाले, प्रत्येक संकटाच्या डोळ्यात...
Aaditya Thackeray on Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Aaditya Thackeray on Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळासह त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेकांनी “काळजी घ्या” अशा शुभेच्छा संदेशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील संजय राऊत यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे.
राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती — जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,” असे त्यांनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray on Sanjay Raut: आदित्य ठाकरे यांचा भावनिक संदेश
आता आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
काळजी घे संजय काका,
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 31, 2025
प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस!
आत्ताही तेच होईल, खात्री आहे!@rautsanjay61 https://t.co/NaG9dGdtsT
Sanjay Raut: पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांच्या शुभेच्छा
दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीसह महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी त्वरित प्रकृतीसुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
Sanjay Raut: शिवसेनेतील महत्त्वाचा चेहरा
संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटातील धोरणनिश्चितीपासून ते संवादकेंद्रापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते आहेत. 2019 मध्ये भाजपासोबत युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे अलीकडील राजकीय जवळिकीचे प्रयत्न असोत किंवा निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाची आखणी या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी संजय राऊत दिसल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा

















