Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासोबतच सर्वसामान्य जनतेमध्ये सापांची ओळख व्हावी, विषारी, बिन विषारी साप कसे ओळखावे
जळगाव : राजकारणी म्हटलं की हाती माईक आणि मुखात जनतेच्या हितासाठीचं भाषण हे ठरलेलंल. त्यात महिला नेत्याही सध्या भाषणात आणि व्यासपीठावर पुढे असल्याचं दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर रोहणी खडसे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमातही त्यांचा कल वाढलेला दिसून येत आहेत. राजकारणात नेहमी हातात माईक घेऊन बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या हातात आज चक्क साप दिसून आल्याने त्यांचा हा नवा अवतार चर्चेचा विषय बनला आहे. तसेच, त्यांच्या हाती बसेलल्या सापाचा (Snake) व्हिडिओदेखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यासोबतच सर्वसामान्य जनतेमध्ये सापांची ओळख व्हावी, विषारी, बिन विषारी साप कसे ओळखावे, साप चावल्यास काय खबरदारी घ्यावी यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जळगावमध्ये करण्यात आले होते. शिवचरण उज्जेंकर फाऊंडेशनकडून मुक्ताई नगर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रोहिणी खडसे सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांनी साप हातात घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. साप म्हटलं की साधारपणे आपली भांबेरी उडते. साप दिसला की आधी दूर पळून जाण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र, रोहिणी खडसेंनी साप हाती घेतल्याने त्यांच्या धाडसाचं मतदारसंघात कौतूक होत आहे.
पावसाळ्यात अनेक घरात, शेतात साप दिसून येतात, त्याचबरोबर शेतीत काम करताना अनेकांना साप चावल्याच्या घटनाही घडतात. त्यात काही जणांचा विषारी साप चावल्याने मृत्यू होतो, तर काहींचा केवळ भीतीने मृत्यू होत असल्याचं यापूर्वी निरीक्षणातून समोर आलं आहे. चावणारा प्रत्येक साप हा विषारी किंवा बिन विषारीच असतो असे नव्हे, ग्रामीण भागातील महिलांना विषारी आणि बिन विषारी सापाची ओळख व्हावी. त्यासाठी महिला सर्प मित्रांनी एका कार्यक्रमाचे आयोजन मुक्ताई नगर शहरात आयोजित केले होते, या कार्यक्रमात रोहिणी खडसे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी एका बिन विषारी सापाला हातात घेतले, असल्याने त्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. तसेच, त्यांचा सापासमवेतचा हा व्हिडिदेखील व्हायरल झाला आहे.
हेही वाचा
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल