कलम 370 रद्द केल्यानंतर बाहेरच्या किती लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी केल्या? केंद्र सरकारने सांगितलं की...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केल्यापासून बाहेरच्या किती लोकांनी येथे मालमत्ता खरेदी केली आहे.
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधून कलम 370 (Article 370) रद्द केल्यापासून बाहेरच्या किती लोकांनी येथे मालमत्ता खरेदी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी लोकसभेत माहिती दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले की, कलम 370 रद्द केल्यापासून केंद्रशासित प्रदेशाबाहेरील 34 लोकांनी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) खासदार हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
नित्यानंद राय यांनी सभागृहात दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, "जम्मू आणि काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाबाहेरील 34 लोकांनी तेथे मालमत्ता खरेदी केल्या आहेत." नित्यानंद राय म्हणाले, या मालमत्ता जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यात खरेदी करण्यात आल्या आहेत.
आधी जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदीची परवानगी नव्हती
याआधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 मुळे इतर राज्यातील लोक येथे मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्या. कलम 370 च्या तरतुदी रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जमीन आणि मालमत्ता खरेदीसाठीचे कायदे बदलले. हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर इतर राज्यांतील लोकांनाही जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- नेहरुंच्या स्मृतींनी ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये आता आजवरच्या सर्व पंतप्रधानांचं संग्रहालय!
- PM Imran Khan : पंतप्रधानपद वाचवण्याचा इम्रान खान यांचा अखेरचा प्रयत्न! एका मुख्यमंत्र्यांचा त्याग, दुसऱ्या पक्षाला ऑफर
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू
- UP Cabinet : योगी सरकार 2.0, उत्तर प्रदेश सरकारचे खातेवाटप, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं मंत्रिपद?
- PM Modi : 1 एप्रिल रोजी दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा', पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद