Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1259 नवीन रुग्ण आढळले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाच्या 1270 रुग्णांची नोंद झाली आहे.
![Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू coronavirus cases in india today 1259 new cases of covid19 35 deaths recorded in the last 24 hour Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 1259 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/16/13589b7425e5e3d9da6fea81d4a70af8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना विषाणूचा कहर सातत्याने कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1259 नवीन रुग्ण आढळले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1270 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 15 हजार 378 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात देशात 1 हजार 705 लोक बरे झाले. यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 378 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 70 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 85 हजार 534 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 21 हजार 982 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत 183 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 13 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभरात लसींचे 25 लाख 920 हजार 407 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 183 कोटी 53 लाख 90 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 27 लाख 30 हजार 34) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai : गर्दीच्या स्थानकांमध्ये आता एकमजली स्टेशन, मुंबईतील 19 स्थानकांचा पुनर्विकास होणार
- Bharat Band : भारत बंदचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत; आरोग्य सेवांवर परिणाम नाही
- मध्य प्रदेशातील 5 लाख 21 हजार कुटुंबांना मिळणार स्वप्नांचं घर, पंतप्रधान मोदींच्या हस्ते गृहप्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)