Eknath Shinde: वैमानिकाचा अचानक विमान उड्डाण करण्यास नकार, एकनाथ शिंदे रखडले; जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
Eknath Shinde In Jalgaon Airplane: जळगाव विमानतळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जवळपास 40 ते 45 मिनिटे ताटकळत राहावं लागलं.

Eknath Shinde In Jalgaon Airplane: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी मुंबईला पोहोचले होते. मात्र, काल (7 जून) रात्री जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डानास नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंना जवळपास 45 मिनिटे विमानतळावर ताटकळत राहावं लागलं. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची शिष्टाई फळाला आली असून एकनाथ शिंदे यांचे रखडलेले विमानाने उड्डाण केले. त्यामुळे जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
वैमिकाने उड्डाण करण्यास नकार का दिला?
वैमानिक सलग 12 तासांपासून विमान उडवण्याचे काम करत होता. त्याच्या प्रकृतीला आणि तांत्रिक नियमांनुसार अधिक काम करणे शक्य नव्हते. यामुळेच, वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान उडवण्यास नकार दिला.
गिरीश महाजन-गुलाबराव पाटील यांची मध्यस्थी-
सदर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाशी चर्चा केली. त्यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, या चर्चेनंतर वैमानिकाने विमान उडवण्यास होकार दर्शवला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, वैमानिकाच्या तब्येतीची अडचण होती. तब्येत म्हणण्यापेक्षा त्यांची काही वेळेचीही अडचण असेल. तांत्रिक अडचण होती. पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो. कंपनीने त्यांच्या भाषेत त्यांना सांगितलं असेल.. विमान आता उडालेलं आहे. पायलटची किरकोळ अडचण होती. मात्र, ती अडचण आता दूर झालेली आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
एकनाथ शिंदेंनी घेतले श्री संत मुक्ताईंचे दर्शन-
आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी पंढरपूराकडे मार्गस्थ झाली. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे एकनाथ शिंदेंनी श्री संत मुक्ताईंचे भक्तिभावाने दर्शन घेतले. तसेच पालखीतील प्रतिमा आणि पादुकांचे मनोभावे दर्शन घेत पालखीचा खांदेकरी होऊन या वारीत सहभागी झालो. या वैष्णवांच्या मेळ्यात सामील होताच सर्व मोठेपणा क्षणात गळून पडला आणि मी कधी त्यांच्यातलाच एक वारकरी होऊन गेलो हे माझे मलाही कळले नाही. माझे भाग्य थोर, की मुक्ताईंच्या पालखी रथाचे सारथ्य करण्याचे परमभाग्य यानिमित्ताने मला मिळाले.
📍 मुक्ताईनगर, #जळगाव |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 6, 2025
विठु माझा लेकुरवाळा !
संगे लेकुरांचा मेळा |
निवृत्ती हा खांद्यावरी !
सोपानाचा हात धरी |
पुढे चाले ज्ञानेश्वर !
मागे मुक्ताई सुंदर |
आषाढी एकादशीला पंढरीच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ मुक्ताईंची पालखी आज पंढरपूराकडे मार्गस्थ झाली. या निमित्ताने जळगाव… pic.twitter.com/585Syk6ed3
राज्यासह देशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांची शिष्टाई फळाला, अखेर एकनाथ शिंदेंचे रखडलेले विमान उडाले
























