VIDEO Manoj Jarange : हXXXX औलादीचा! देशमुख कुटुंबीयांना धमक्या दिल्या तर धनंजय मुंडेला रस्त्याला फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांना न्याय मागितल्यानंतर आम्ही कसे जातीयवादी झालो? तुम्ही आरोपींचे समर्थन करणारे जातीयवादी नाहीत का? असे सवाल मनोज जरांगे यांनी केले.
परभणी : आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबीयांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा शेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही, देशमुख कुटुंबीयांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीयवादी कसे काय? असा सवालही जरांगे यांनी विचारला. संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते.
मनोज जरांगे म्हणाले की, "धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देताय? त्याचा भाऊ गेला आणि तो न्यायासाठी लढतोय, वणवण फिरतोय. त्याला तुम्ही धमक्या देताय. संतोष भैयाचे भाऊ जेव्हा पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना धमकावण्यात आले. यापुढे जर त्यांचे कुटुंब आणि कुणाला धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर लक्षात ठेवा. परळी असो की बीड, इथल्या समाजाला ही त्रास झाला तर घरात घुसून मारायचे. देशमुख कुटुंबीयांच्या मागे सगळा मराठा समाज आहे. आम्ही फक्त कायद्याला मानतोय, म्हणून आम्ही शांत आहोत. सगळे आरोपी पकडले जातील, फासावर जातील असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला."
सगळेच आरोपी पुण्यात कसे सापडतात?
संतोष देशमुखांच्या हत्येमधील सगळेच आरोपी पुण्यात कसे काय सापडतात? पुण्यामध्ये त्यांना कोण सांभाळलं? त्यांच्यामागे राज्यातील मंत्र्याचा होत होता का? असे प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारले.
आकाच्या आकाला जेलमध्ये जावं लागेल
यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "माझ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. यांना मोक्का लागला पाहिजे. आकाच्या आकाला जेलमध्ये जावं लागेल. आकाच्या आकाने जर काही केले तर तोही गेलाच समजा. ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती? छत्रपती संभाजीराजांच्या हत्येप्रमाणेच ही हत्या करण्यात आली. त्या लेकराने काय बिघडवले होते. फक्त एका दलित मुलाला वाचवायला गेला म्हणून त्याला असं मारलं."
ज्यांनी आमच्या वाडवडिलांच्या जमिनीवर पीक विमा लावला आणि पैसा खाल्ला त्यांच्यावर मोक्का लावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
अजितदादा, क्या हुआ तेरा वाद?
संगीत दिघोळे ते संतोष देशमुख यांच्यापर्यंत किती खून झाले याची माहिती अजितदादांनी घ्यावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली. हत्यांची बेरीज केली तर या हत्या कोणी घडवल्या हे पाहा. हे जर माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीला पाठवा आणि माहिती घ्या. प्रकाश सोळंखेंना मंत्रीपदाची संधी द्या, ते पाच वेळा