परभणी जिल्ह्यातील तीन तलाव कोरडेठाक, नऊ तलाव जोत्याखाली; पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल
Parbhani Dam Water Storage Update: आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Parbhani Dam Water Storage Update: परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 22 पैकी नऊ लघु तलावांतील पाणी पातळी खालावली आहे. या तलावातील पाणी जोत्याखाली आले असून त्यात उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिलेला नाही. त्यातच पाच तलावात उपयुक्त पाण्याची टक्केवारी 10 च्यात आत राहिली असताना, तीन तलाव कोरडेठाक पडल्यात जमा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन परभणी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पातील पाणीसाठा आता कमी होऊ लागला आहे. तर काही प्रकल्प कोरडेठाक पडली आहे. परभणी जिल्ह्यात 22 लघु तलाव उभारण्यात आलेले आहेत. सर्वाधिक 13 तलाव जिंतूर तालुक्यात आहेत. त्यातील बेलखेडा, जोगवाडा आणि चारठाणा येथील तलावात पाणी उपलब्ध नाही. त्याव्यतिरीक्त चिंचोळा, माडवी, आडगाव आणि केहाळ तलावाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. विशेष म्हणजे हे तलाव गतवर्षीदेखील यावेळी कोरडे होते. दुसरीकडे वडाळी 8 टक्के, भोसी 22 टक्के, पाडाळी 15 आणि कवडा तलावात 7 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. शिवाय, मे महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन अधिक होऊ लागले.
जिल्ह्यातील परिस्थिती...
- जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात 3टक्के म्हणजे 0.35 दलघमी पाणी असून त्याची, एकूण साठवण क्षमता 0.196 लघमी आहे.
- गंगाखेड बालुक्यातील टाकळगाव आणि कोद्री लावाचे पाणी जोत्याखाली आहेत. याच तालुक्यातील
- राणीसावरगाव तलावात 40 टक्के पाणी असून 0.489 दलघमी पाणी आहे. त्याची 1.273 दलघमीची साठवण क्षमता असून गतवर्षी या दिवसांत 45 टक्के पाणी होते.
- परभणी तालुक्यातील पेडगाव तलावाचा पाणीसाठा जोत्याखाली असून, साठवण क्षमता 2 .616 आहे.
- मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावाचा पाणीसाठा जोत्याखाली असून, साठवण क्षमता 2 .867 आहे.
- पाथरी तालुक्यातील झरी तलावाचा पाणीसाठा सर्वाधिक ७४ टक्के असून, साठवण क्षमता 1.836 दलघमी आहे.
- पालम तालुक्यात तांदुळवाडी तलावाचा पाणीसाठा 28 टक्के असून, साठवण क्षमता 2.257 दलघमी आहे.
पाणीटंचाईच्या संकटाची चाहूल...
यंदा पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच मोठ्याप्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाची देखील चिंता वाढत आहे. तसेच पाऊस उशिरा आल्यास परभणी जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: