एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Assembly Election 2024 : परभणीत विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जोरदार घमासान; भाजप पदाधिकाऱ्यांचा गंभीर इशारा, म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच परभणीमध्ये महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे.

परभणी : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. मात्र विधानसभेच्या तोंडावरच परभणीमध्ये (Parbhani News) महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

परभणी विधानसभेची जागा मित्र पक्षाला न सोडता भाजपला सोडण्यात यावी आणि पाथरीची जागा भाजप ऐवजी शिवसेनेला सोडण्यात यावी, अशी मागणी परभणीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय जर असं झालं नाही तर भाजपचे पदाधिकारी शिवसेना असो की राष्ट्रवादी यांचे काम करणार नसल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय. तसेच वरिष्ठ नेत्यांना भेटूनही त्यांच्यासमोर ही मागणी करणार असल्याचेही या नेत्यांनी ठरवले आहे. त्यामुळे आता शिवसेनेची काय भूमिका ठरते? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

परभणीची जागा भाजपला तर पाथरीची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी 

परभणी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेतेही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाथरी विधानसभेची भाजपची जागा ही शिवसेनेला सोडण्यात यावी आणि परभणीची जागा ही शिवसेनेऐवजी भाजपला सोडण्यात यावी, परभणीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्याच अनुषंगाने ही जागा जर मित्र पक्षाला सोडली तर मित्र पक्षाचे काम न करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. त्यामुळे महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच वाद पाहायला मिळत आहे. आता महायुतीतील वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आचारसंहिता कधी लागणार? 

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत.  कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता  आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

फलटण-कोरेगावमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकणार; अजित पवारांना धक्के सुरुच

टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही शिंदे सरकारचा धडाका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget