एक्स्प्लोर
'खून का बदला खून से...', परभणीत फिल्मीस्टाईल हत्येचा कट पोलिसांनी उधळला
मनपा माजी नगरसेवक अमरदीप रोडे याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेल्या व्यंकट शिंदे टोळीच्या चौघांना पिस्टल, रिव्हॉल्वर काडतुसांसह परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे परभणीत होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला टाळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
परभणी : परभणीत माजी नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी परीक्षा देण्यासाठी पॅरोलवर बाहेर आला असताना त्याच्या हत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले. त्यांच्याकडून 1 रिव्हॉल्वर, एका देशी कट्ट्यासह 10 काडतुसेही जप्त केल्याने परभणीत खळबळ उडाली आहे.
मनपा माजी नगरसेवक अमरदीप रोडे याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आलेल्या व्यंकट शिंदे टोळीच्या चौघांना पिस्टल, रिव्हॉल्वर काडतुसांसह परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे परभणीत होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेला टाळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही महिन्यापूर्वी परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांची रवी गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी हत्या केली होती. रवी गायकवाड हा सध्या जामिनावर सुटलेला असून 27 डिसेंबरपासून तो वसमत रोडवरील विधि महाविद्यालयामध्ये एलएलबीची परीक्षा देत आहे. परीक्षेदरम्यान त्याची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती परभणी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी रवी गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती देऊन परीक्षेच्या ठिकाणी संशयितांच्या हालचालींवर साध्या वेशात राहून पाळत ठेवली.
दरम्यान एक जानेवारी रोजी दुपारी एक वाजता विधी महाविद्यालयाचा कायद्याचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर येऊ लागले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या गर्दीमध्ये पोलीस पथकास देवेंद्र देशमुख, शेख फिरोज शेख सलीम आणि आणखी एकजण दिसून आले. दरम्यान त्यांना पकडण्याचा पोलिसांनी परिपूर्ण प्रयत्न केला पण हे जण विद्यार्थ्यांच्या घोळक्यामधून पळून गेले. दरम्यान एक जानेवारीच्या रात्री आठ वाजता शेख फिरोज शेख सलीम, सचिन पवार आणि मनोज पंडित हे जिंतूर रोडवरील हायटेक जिम मध्ये आलेले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. तिथं फिरोज व इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी फिरोजकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे, एक रिव्हॉल्वर, 6 काडतुसे मिळून आली. त्यानंतर देवेंद्र देशमुख यास त्याच्या राहत्या घरातून कोयता आणि खंजीरसह ताब्यात घेण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement