Pandharpur Wari 2025: होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025 : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे.

Ashadhi Wari 2025 पुणे : पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. अशातच तमाम ज्या क्षणांची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते टो मंगल क्षण आज आलाय. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे. विविध नेतेमंडळी या प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल होणार आहेत. सध्या इंद्रायणी काठावर वारकऱ्यांची मांदीयाळी पाहायला मिळतेय.
श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025) आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आता, या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, अनुक्रमे 18 आणि 19 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे.
यंदाचा 340वा पालखी सोहळा, देहूत भक्तांची मांदियाळी
प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे. यंदाच्या या 340वा पालखी सोहळा असून ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढ घेऊन लाखों भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने विशेष खबरदारी घेत सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. यात मंदिरात 42 व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे. यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे.
संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025 :-
18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
(इंदापूर येथे गोल रिंगण )
30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
(माळीनगर येथे उभे रिंगण )
3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
(वाखरी येथे उभे रिंगण )
6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
हे ही वाचा























