एक्स्प्लोर

Pandharpur Wari 2025: होय होय वारकरी,पाहे पाहे रे पंढरी.., जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान; देहूत भक्तांची मांदियाळी

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025 : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे.

Ashadhi Wari 2025 पुणे : पावसाळ्याला सुरुवात होताच विठुरायांच्या भक्तांना ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंग भेटीची. अशातच तमाम ज्या क्षणांची गेल्या वर्षभरापासून वारकरी वाट पाहत होते टो मंगल क्षण आज आलाय. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा  (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळा आज देहूतून दुपारी प्रस्थान होणार आहे आणि याच सोहळ्याची लगबग सध्या देहूत पाहायला मिळते आहे. विविध नेतेमंडळी या प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत दाखल होणार आहेत. सध्या इंद्रायणी काठावर वारकऱ्यांची मांदीयाळी पाहायला मिळतेय.  

श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025) आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आता, या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, अनुक्रमे 18 आणि 19 जुलै रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे. 

यंदाचा 340वा पालखी सोहळा, देहूत भक्तांची मांदियाळी

प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती पुढे आली आहे. यंदाच्या या 340वा पालखी सोहळा असून ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या बा विठ्ठलाच्या भेटीच्या ओढ घेऊन लाखों भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने विशेष खबरदारी घेत सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. यात मंदिरात 42 व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे. यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यासाठी वारकऱ्यांची पायी वारी सुरू झाली आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे. 

संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025 :-

18 जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम 
19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम 
20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम 
21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम 
22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम 
23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम 
24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम 
25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम 
26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम 
27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम 
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण) 
29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम 
(इंदापूर येथे गोल रिंगण )
30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम 
1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम  (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम 
(माळीनगर येथे उभे रिंगण )
3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम 
4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम 
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम 
(वाखरी येथे उभे रिंगण )
6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान 
10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात

हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 June 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, लक्ष्मी कृपेने आर्थिक समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, लक्ष्मी कृपेने आर्थिक समस्या संपणार, आजचे राशीभविष्य
पोलिसांच्या माध्यमातून आमच्या उमेदवारांवर प्रेशर ,सत्ताधाऱ्यांचा बहुमताचा माज मतदार उतरवतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल
पोलिसांच्या माध्यमातून आमच्या उमेदवारांवर प्रेशर ,सत्ताधाऱ्यांचा बहुमताचा माज मतदार उतरवतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Land Scam VIDEO : धक्कादायक! AI च्या मदतीने बनावट दस्त, 25 कोटींची जमीन परस्पर विकली, छ. संभाजीनगर-जालन्यात मोठं रॅकेट
धक्कादायक! AI च्या मदतीने बनावट दस्त, 25 कोटींची जमीन परस्पर विकली, छ. संभाजीनगर-जालन्यात मोठं रॅकेट
ABP Majha Impact : कल्याणमधील 'तिसाई' शाळेवरील कारवाईला तूर्तास स्थगिती; एकनाथ शिंदेंचा आदेश, 1200 विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित
कल्याणमधील 'तिसाई' शाळेवरील कारवाईला तूर्तास स्थगिती; एकनाथ शिंदेंचा आदेश, 1200 विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget