एक्स्प्लोर

Vasai Crime : पाण्याच्या बॉटलमध्ये लघवी टाकली अन् महिलांना दिली, वसईतल्या कंपनीमध्ये धक्कादायक कृत्य

Vasai Crime : कंपनीमध्ये रात्री झोपायला आलेल्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या बाटल्यांमध्ये लघवी केल्याचा आरोप तक्रारदार मुलींकडून करण्यात आला आहे. 

पालघर : वसईत एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका कंपनीत अज्ञातांनी महिलांच्या पिण्याच्या बॉटलमध्ये युरिन टाकलं होतं. त्यातील एका महिलेने पाणी समजून चकून ते प्यायल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर कंपनीतील तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं. तेथे त्यांनी आपली लेखी तक्रार दिली आहे. यावर आता पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. 

वसई पूर्वेच्या इंमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल 110 या कंपनीतील ही धक्कादायक घटना आहे. या कंपनीत मुक्ती बरुड, प्रिती गायकर आणि रेखा जाधव या तीनच मुली काम करतात. रात्रीच्या वेळी या कंपनीत दुसऱ्या कंपनीतील चार कामगार झोपण्यासाठी येतात. 

शुक्रवारी सकाळी कंपनीत आल्यावर त्यातील एक मुलगी पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायली. मात्र ते घाणेरडं लागल्याने तिने उलटी केली. ती बाटली नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये युरिन असल्याचं लक्षात आलं. इतरही दोन बाटल्यांमध्ये युरिनच ठेवण्यात आलं होतं.

मालकाने उलटा मुलींवरच संशय व्यक्त केला

हा किळसवाना प्रकार रात्री झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा आरोप या मुलींनी केला. याची तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली असता त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर संतापलेल्या त्या मुलींनी थेट वसईचं माणिकपूर पोलीस ठाणे गाठलं आणि आपली लेखी तक्रार पोलिसांना दिली. 

आरोपींसह कंपनीच्या मालकावर कारवाई करा अशी मागणी तक्रारदार मुलींनी केली आहे. माणिकपूर पोलिस आता या घटनेची चौकशी करत असल्याची माहिती माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने यांनी दिली. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Aakrosh Morchaदेशमुख हत्या प्रकरणी बारामतीत आक्रोश मोर्चा,3 महिन्यानंतरही कृष्णा आंधळे फरारSpecial Report Marathi :हॉटेलात मेन्यू कार्ड मराठी करा,ठाकरेंच्या शिवसेनेचा आग्रह, मुंबईकर म्हणतात..IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात भारत-न्यूझीलंड फायनल,सुनंदन लेले यांचा दुबईतून रिपोर्टMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
जगात कोणत्या देशाचे चलन सर्वात महाग आहे?
Virat Kohli Profile : क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
क्रिकेटचा 'किंग', क्रीजवर टिकला की विरोधी संघाला सळो की पळो करून सोडणारा लढवय्या 'विराट'
IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला जॅकपॉट लागणार, जो जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस; जाणून घ्या नेमकं काय-काय मिळणार?
ST Bus : एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईकांकडेच, फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश
VIDEO: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, तर दुसरीकडे गोविंदावर कोसळला दुःखाचा डोंगर; ढसाढसा रडला अभिनेता
Embed widget