Pakistan on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'यात आमचा हात नाही'
Pakistan Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर शेजारी देश पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आलीय. पाकिस्तानने स्वतःला स्वच्छ घोषित करून भारतावर आरोप केले आहेत.

Pakistan on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर शेजारी देश पाकिस्तानची (Pakistan) प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. एका पाकिस्तानी टीव्ही वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी आरोप केला आहे की, या हल्ल्यामागे भारतातील लोकांचा हात आहे. तिथल्या लोकांनी सरकारविरुद्ध बंड केलंय. दुसरीकडे नागालँडपासून मणिपूर आणि काश्मीरपर्यंत, लोक सरकारच्या विरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांची हत्या करत आहे. सरकार त्यांचे शोषण करत आहे. लोक या विरोधात उभे राहिले आहेत. (Pakistan Reaction Pahalgam Terror Attack)
We have absolutely nothing to do with it. We reject terrorism in all its forms and everywhere, says Pakistan's Defence Minister Khawaja Asif on the #Pahalgam attack.#pahalgamattack pic.twitter.com/qGiTz6uVOn
— Ghulam Abbas Shah (@ghulamabbasshah) April 23, 2025
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले आहे की, भारताचे सध्याचे सरकार तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याकांना त्रास देत आहे. यामध्ये बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा समावेश आहे. लोकांची कत्तल केली जात आहे. लोक याविरुद्ध आवाज उठवत आहेत. आमचा अशा घटनांशी काहीही संबंध नाही. मी अशा हल्ल्यांचा निषेध करतो. विशेषतः नागरिकांवर असे हल्ले होऊ नयेत. असेही पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले.
सौदी अरेबियाहून परत येताच पंतप्रधानांनी घेतली बैठक
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (23 एप्रिल) सकाळी सौदी अरेबियाहून परतल्यानंतर विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी बैठक घेतली.या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील उपस्थित होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगामवर हल्ला केला. ज्यामध्ये किमान 26 जणांचा मृत्यू झालाय आणि अनेक जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश असून त्यात एक संयुक्त अरब अमिराततील आणि एक नेपाळचा असल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
























