Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: भारताच्या नंदनवनात निष्पापांचा आक्रोश! दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र संताप; पहलगामात आतापर्यंत काय-काय झालं?
Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढला असून यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pahalgam Terror Attack: भारताचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या भूमीवर पुन्हा एकदा दहशतवादाने थैमान घातले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हल्लेखोरांनी भारतीय नागरिकांना त्यांचे नावे आणि धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचे सांगितले जात आहे. या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जगभरात संतापाची लाट पसरली असून सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटतांना दिसत आहे. अशातच या हल्ल्यात आतापर्यंत नेमकं काय काय झालं हे जाणून घेऊया.
पहलगाम हल्ला घटनाक्रम
22 एप्रिल
3.45 - पहलगाम येथे गोळीबार झाल्याची माहिती
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी
4 वाजून 4 मिनिटे - मोठा फौजफाटा, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
हल्लेखोरांकडून पर्यटक जखमी झाल्याची माहिती
4 वाजून 29 मिनिटे - भाजप नेते रवींद्र रैना यांची प्रतिक्रिया
4 वाजून 30 मिनिटे - हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अधिकची कुमक घटनास्थळी
4 वाजून 30 मिनिटे - पीडीपी नेता मेहबुबा मुफ्ती यांची प्रतिक्रिया
संध्याकाळी 5 वाजता - जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया
5 वाजून 37 मिनिटे - पंतप्रधान मोदींचा अमित शाह यांना फोन
तातडीने योग्य त्या उपाययोजना आणि घटनास्थळी जाण्याची सुचना
5 वाजून 35 मिनिटे - मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला राजधानी श्रीनगरमध्ये
5 वाजून 40 मिनिटे - जखमी पर्यटक पहलगाम इस्पितळात दाखल
5 वाजून 57 मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया
दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
6 वाजून 3 मिनिटे - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
6 वाजून 19 मिनिटे - विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
6 वाजून 31 मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; हल्ल्यामागील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे आश्वासन
6 वाजून 35 मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ताफा काश्मीरसाठी रवाना
6 वाजून 26 मिनिटे - कर्नाटकचे रहिवासी हल्ल्यात बळी ठरल्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
6 वाजून 45 मिनिटे - हल्ल्यात गुजरातमधील पर्यटक बळी, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांची माहिती
6 वाजून 46 मिनिटे - परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध
6 वाजून 56 मिनिटे - दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू झाल्याची राजभवनाकडून माहिती
7 वाजून 6 मिनिटे - देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हल्ल्याचा निषेध
7 वाजून 20 मिनिटे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे विमानाचे श्रीनगरच्या दिशेने उड्डाण
7 वाजून 35 मिनिटे- जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला पहलगामच्या दिशेने रवाना
7 वाजून 42 मिनिटे - आर्मीच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचेन्द्र कुमार दिल्लीहून श्रीनगरच्या दिशेने रवाना
संध्याकाळी 8 वाजता - हल्ल्यात जखमी झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची यादी जाहीर
8 वाजून 9 मिनिटे - जम्मू काश्मीर सरकारकडून आप्तकालीन नियंत्रण कक्षाची हेल्पलाईन जारी
8 वाजून 32 मिनिटे- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माध्यमांना प्रतिक्रिया, महाराष्ट्रातील पर्यटक हल्ल्यात बळी ठरल्याची माहिती
8 वाजून 43 मिनिटे - गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये पोहचले, उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीला सुरुवात
८ वाजून ५६ मिनिटे - श्रीनगरमध्ये स्थानिकांकडून मेणबत्ती मोर्चा
9 वाजून 19 मिनिटे - राजधानी दिल्लीत सुरक्षा अलर्ट मोडवर
9 वाजून 40 मिनिटे - पूंच येथे दहशतवाद्यांविरोधात स्थानिकांची निदर्शने
10 वाजता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू
जगभरातून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध, भारताला जगभरातून शोकसंदेश आणि पाठिंबा
10 वाजून 18 मिनिटे - रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा शोकसंदेश तर दहशतवादाविरोधातील लढाईत भारताला पाठिंबा
सौदी अरेबियाच्या राष्ट्रप्रमुखांकडून आयोजित डिनर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रद्द
23 एप्रिल
सौदी अरेबियाचे राष्ट्रप्रमुख मोहम्मद बिन सालेम यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध; भारतात नव्या दोन ऑइल रिफायनरीची घोषणा
रात्री 1 वाजून 13 मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोन
दहशतवादाविरोधातील लढाईत भारतासोबत असल्याचे ट्रंप यांचे आश्वासन
रात्री 2 वाजून 10 मिनिटे - पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यातून संपवून भारताच्या दिशेने रवाना
रात्री 2 वाजून 23 मिनिटे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अमेरिका - पेरू देशाचा दौरा अर्ध्यातून रद्द
इतर महत्वाच्या बातम्या
























