एक्स्प्लोर

निव्वळ वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला धडकी; जल, थल, आकाश  कारवाईसाठी भारतीय लष्कराला 'फ्री हँड', आता पर्यंत नेमकं काय काय घडलं? 

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेय. दरम्यान, आता घडामोडींना वेग आले आहे. 

Pahalgam Terror Attack: गेल्या सात दिवसांपासून पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात संपूर्ण देश संतापाने पेटला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना ठेचा, बदला घ्या, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवा, अशी मागणी भारतभरातून होत आहे. अशातच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या मोठ्या कारवाया सुरू आहेतच, मात्र दहशतवाद्यांचे आका सीमापार पाकिस्तानात आहेत. त्यामुळे दहशतवादाविरोधात आता आरपारची लढाई सुरू करण्याचा संकल्प मोदी सरकारने केल्याचं दिसतंय. 

तर दुसरीकडे हल्ल्यातील गुन्हेगारांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा स्पष्ट इशारा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. पाकिस्तानला कोणत्याही क्षणी मोठा हल्ला होण्याची भीती आहे आणि या भीतीमुळे पाकिस्तानी मंत्री केवळ हास्यास्पद विधाने करत नाहीत तर युद्ध झाले तर ते तयार असल्याचेही भासवत आहेत. अशातच गेल्या 7 दिवसांत या प्रकरणात नेमकं काय-काय  घडले ते सविस्तरपणे जाणून घेऊ.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण 

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हिल स्टेशनवर मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर, पहलगाममधील स्थानिक लोकांनी पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात मोर्चा काढला. या घटनेचा देशभर निषेध करण्यात आला आणि लोकांनी केंद्रातील मोदी सरकारकडे दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडण्याची आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

पंतप्रधान मोदी तडकाफडकी सौदी अरेबियावरुन मायदेशी 

या घटनेनंतर लगेचच, पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावरून परतले. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि जलद आणि निर्णायक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे."

पहलगाम हल्ल्यावर अनेक देशांनी व्यक्त केले दुःख 

-पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार आणि युक्रेनमधील भारतीय दूतावासानेही या हल्ल्याचा निषेध केला.

-अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंन्स यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि 'एक्स' वर लिहिले: "उषा आणि मी भारतातील पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण या देशाचे आणि त्याच्या लोकांच्या सौंदर्याने भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्यात आमच्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत."

- दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करताना इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी 'एक्स' वर लिहिले की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने खूप दुःख झाले आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायल भारतासोबत एकजुटीने उभा आहे."

- पहलगाम हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करताना, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने 'X' वर लिहिले की, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल युक्रेनला खूप चिंता आहे. दहशतवादामुळे आपण दररोज जीव गमावतो आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. "जेव्हा निष्पाप लोक मारले जातात तेव्हा असह्य वेदना होतात. गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे."

 हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी चकमक, दोन दहशतवादी ठार

पहलगाम हल्ल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. भारतीय सैन्याने सांगितले की, बुधवारी बारामुल्लामधील उरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून सुमारे दोन-तीन दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असताना ही चकमक सुरू झाली. त्यांनतर सीमेवर सलग गोळीबाराचा घटना घडल्या.

दहशतवाद्यांसह त्यांच्या आकाला पंतप्रधानांचा थेट इशारा 

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (24 एप्रिल 2025) बिहारमध्ये आयोजित एका सभेत बोलताना म्हटले होते की, मी पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन त्यांना(दहशतवाद्यांना) शोधून काढेन. त्यांना सांगण्यात आले की त्यांना (दहशतवाद्यांना) त्यांच्या कृत्यांसाठी शिक्षा मिळेल, जी त्यांच्या कल्पनेपलीकडे असेल.

पाकिस्तानच्या बचावासाठी चीन सरसावला 

चीनने आपल्या मित्र देश पाकिस्तानचा बचाव केला आणि पहलगाम हल्ल्याची जलद चौकशी करण्याची मागणी केली. या संदर्भात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशीही चर्चा केली.

- सरकारने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल 'ब्लॉक' केले
-  भारतातून हजारो पाकिस्तानी मायदेशी परतले
- भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स् (X) खाते ब्लॉक केलं
- भारताने बंदरे आणि हवाई क्षेत्र बंद केले
- पंतप्रधान मोदी म्हणाले- 'कार्यवाहीची वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला आहे'

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: आज गर्दी कमी, उद्या येऊया...दहशतवादी काय म्हणाला? जालन्यातील तरुणाने सांगितले; पहलगाममध्ये हल्ल्याच्या एक दिवसआधी काय घडलं?

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 16 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 16 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 16 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 16 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget