एक्स्प्लोर

Osmanabad: सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान अख्ख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूरवाडीचा निर्णय

Jakekurwadi: उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी या गावात दररोज मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

उस्मानाबाद: टीव्ही मालिका आणि मोबाईलमुळे प्रत्येकाचे आयुष्य गुरफटून गेलं आहे. याचा परिणाम कुटुंबासह विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. अशीच काहीशी भावना असल्याने उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी (Jakekurwadi) या गावाने मुलांच्यासाठी  दररोज दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद (Mobile phones and TV off) ठेवण्याचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाला दोन दिवस झालेत. विशेष म्हणजे सर्वांचे मोबाईल आणि टीव्ही सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत बंद ठेवले जात आहेत. 

सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन-अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. मुले तासंतास मोबाईलला चिकटून असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिका पाहण्यात गुंतून जातात. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे जकेकूरवाडी (Osmanabad Jakekurwadi)गावाने हा निर्णय घेतला आहे. 

या गावात दररोज नियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याची आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ग्रामपंचायत  रोज सायरन वाजवते. ग्रामीण भागात मुलांना अभ्यासाची सवय लागावी, तसेच टिव्ही आणि मोबाईलसारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना आपले टीव्ही, मोबाईल, रेडिओ, लाऊड स्पीकर सर्व बंद करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे अशी सूचना आपोआप मिळते.

राज्यातील हा दुसरा प्रयोग आहे. असा प्रयोग यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहितेची वाडी या गावात करण्यात आला आहे. असा उपक्रम रावणारे हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील जकेकूरवाडी हे राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले गाव ठरले आहे. या उपक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. मुलं घराबाहेर पडणार नाहीत याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Embed widget