एक्स्प्लोर
पावसाच्या दडीनंतरही राज्यात कृत्रिम पावसाची शक्यता नाहीच
ऐन पावसाळ्यात वरुणराजाने दडी मारल्यामुळे सध्या सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत? त्या ढगावर केव्हा रासायनिक घटकांची फवारणी करावी याचा अभ्यास सुरु आहे. मात्र या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या संचालिका तारा प्रभाकरन यांनी दिली आहे.
उस्मानाबाद : ऐन पावसाळ्यात वरुणराजाने दडी मारल्यामुळे सध्या सोलापूरमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोणते ढग योग्य आहेत? त्या ढगावर केव्हा रासायनिक घटकांची फवारणी करावी याचा अभ्यास सुरु आहे. मात्र या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या संचालिका तारा प्रभाकरन यांनी दिली आहे.
सुमारे 100 कोटी रुपये बजेट असलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पासाठी परदेशातून आलेली विविध उपकरण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या आवारात बसवण्यात आली आहेत. वैज्ञानिक पर्जन्य छायेतल्या ढगांचा मान मोडून अभ्यास करत आहेत. मात्र या वर्षी महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग होण्याची शक्यता कमीच आहे.
सी बॅण्ड रडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रडारमधून पर्जन्य छायेतल्या ढगावर आडव्या आणि उभ्या लहरी सोडल्या जातात. या लहरी ढगांना भेदून जी माहिती देतात त्यावर आधारित कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू होतील. दुष्काळी पट्ट्यातल्या ढगांचा, वातावरणाचा 24 वैज्ञानिकांची टीम अभ्यास करत आहे.
कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी ढगांवर सोडियम क्लोराईड किंवा कॅल्शियम क्लोराइड असे घटक फवारले जातात. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये असलेल्या या उपकरणांच्या साहाय्याने किमान 200 वेळा फवारणीचे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष मांडले जाणार आहेत. सोलापूर विमानतळावर दोन विमान तैनात करण्यात आली आहेत.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा उपयोग करून कृत्रिम पावसासाठी पर्जन्य पर्जन्यछायेच्या प्रदेशाची आलेली माहिती देशभरासाठी उपयोगी असणार आहे.
पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी करमाळा, तुळजापूर, उस्मानाबाद, अक्कलकोटपासून कर्नाटकातल्या इंडीपर्यंत 120 पर्जन्य मापक यंत्र बसवलेली आहेत. सगळी यंत्रणा आधुनिक आहेत.
प्राथमिक अभ्यासामध्ये पर्जन्य छायेतल्या ढगांमध्ये पाऊस पडण्याएवढी क्षमता असल्याचं दिसून आलं आहे. परंतु अभ्यासाचे पूर्ण निष्कर्ष हाती यायला वेळ लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement