एक्स्प्लोर
भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचा अमेरिकेच्या राजदूत पदाचा राजीनामा
फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी 46 वर्षीय निक्की हेली यांना राजीनामा स्वीकारला आहे.

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या राजदूत असलेल्या भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी 46 वर्षीय निक्की हेली यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
निक्की यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डोनॉल्ड ट्रम्प आणि निक्की यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव साराह सँडर्स यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसमधील सत्ता परिवर्तनानंतर अमेरिकेच्या प्रशासनात कॅबिनेट स्तरीय पदावर नियुक्ती होणाऱ्या निक्की हेली या पहिल्याच भारतीय महिला होत्या. त्याआधी निक्की दक्षिण कॅरोलिनाच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी निक्की यांच्या नावाची शिफारस केली होती.United States President Donald Trump accepted the resignation of Nikki Haley as the United Nations Ambassador
Read @ANI Story | https://t.co/OCNDNWrIbt pic.twitter.com/sg2WmnrpLB — ANI Digital (@ani_digital) October 9, 2018
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























