मुंबईत बेकायदेशीर बांधकाम नवीन नाहीत, अशा कारवाईने लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यास संधी; शरद पवारांचा घरचा आहेर
कंगनाच्या एकूण प्रकरणावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, याला आपण अधिक महत्व देतोय असं मला वाटतं. अशी वक्तव्य करणाऱ्यांचा जनमानसावर काय परिणाम होतो हेही बघावं लागेल.
मुंबई : कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे. मुंबईत बेकायदेशीर बांधकाम नवीन नाहीत. पण सध्याच्या पार्श्वभूमीवर अशी कारवाई केली तर लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यास संधी आपण देतो, असं शरद पवारांनी म्हटलं.
कंगना रनौत यांच्या कार्यालयविषयी मला फारशी माहिती नाही. वर्तमान पत्रात अनधिकृत बांधकाम असल्याबाबत मी वाचलं. पण माहिती असल्याशिवाय भाष्य करणं योग्य नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियमावलीनुसार कारवाई योग्य वाटत असेल तर ठीक आहे., असंही ते म्हणाले.
महापालिकेने पाडकाम केल्यावर कंगनाचा ट्विटरवर थयथयाट; पालिकेला म्हणाली बाबरची आर्मी
आज मेरा घर टुटा, कल तेरा घमंड टुटेगा; मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाची टीका
शहाण्या लोकांना अशा गोष्टींमध्ये फारसं पडू नये
कंगना रनौतवच्या पोलिसांवरील वक्तव्याबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, या प्रकरणाला आपण अधिक महत्व देतोय असं मला वाटतं. अशी वक्तव्य करणाऱ्यांचा जनमानसावर काय परिणाम होतो हेही बघावं लागेल. अशा वक्तव्यांना फार गांभीर्याने घेत नाहीत. या शहरातील, राज्यातील पोलीस दलाबद्दल इथल्या जनतेला अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यांचं कर्तृत्व लोकांना माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानशी तुलना केली किंवा आणखी कोणाशी तरी आपण फार लक्ष देऊ नये. माझी तक्रार मीडियाशी आहे. विनाकारण यांनी मोठं केलेलं आहे. आपणही दुर्लक्ष करावं. शहाण्या लोकांना अशा गोष्टींमध्ये फारसं पडू नये.
महत्त्वाच्या बातम्या :- कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात
- बीएमसीने कंगनाला पाठवलेली नोटीस बेकायदेशीर; कंगना रनौतच्या वकिलांचा आरोप
- कंगना रनौतच्या ऑफिसला महापालिकेकडून नोटीस; रहिवाशी जागेचा कार्यालयीन वापर केल्याचा कंगनावर ठपका
- ना डरूंगी, ना झुकूँगी.... मुंबईत येण्यापूर्वी कंगना रनौतचं ट्वीट
- 'मुंबाई मातेचा अवमान करणारे बेइमान', सामनातून टीका, कंगनानंही दिलं उत्तर