Mehboob Shaikh: देवाभाऊ सत्तेच्या जीवावर हे वळू माजलेत; त्यांनीच हा हैदोस घातला; डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका
भोसले हा रंजीत निंबाळकर यांचा नगरसेवकाचा संभाव्य उमेदवार आहे. त्याच हॉटेलमध्ये हा मृतदेह कसा आढळला? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहेबुब शेख यांनी सरकारवर टीका केली आहे.

Mehboob Shaikh बीड: आमच्या बीडच्या लेकीची हत्या झाली, ती आत्महत्या (Phaltan Doctor Death) दाखवली गेली. आमच्या संपदाच्या किंकाळ्या मुख्यमंत्र्यांना (Devendra Fadnavis) ऐकायला येतील, असं वाटलं होतं. ज्या खासदाराचं आणि दोन पीएचं नाव संपदाने तक्रारीत नाव लिहिलं, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ जर पुढार्यांच्या पाठीशी उभे राहणार असतील तर लेकी बाळींनी न्याय कोणाकडे मागायचा? जिथे संपदाचा मृतदेह आढळला ते हॉटेल हे भोसले नामक व्यक्तीचं आहे. भोसले हा रंजीत निंबाळकर यांचा नगरसेवकाचा संभाव्य उमेदवार आहे. त्याच हॉटेलमध्ये हा मृतदेह कसा आढळला? असा सवाल करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहेबुब शेख (Mehboob Shaikh) यांनी सरकारवर टीका केली आहे.
सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आणि मूळ बीड जिल्ह्याची रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Death) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मेहेबुब शेख बोलत होते.
Mehboob Shaikh on Phaltan Doctor Death Case : देवाभाऊ सत्तेच्या जीवावर हे वळू माजलेत
लॉज येथील संपदा आल्यापासूनचे मिनिट टू मिनिटचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजेत. देवाभाऊ सत्तेच्या जीवावर हे वळू जे माजले आहेत त्यांनी हैदोस घातला आहे. फलटणमध्ये दहशत आहे. हगवणेवर ईडी, MPDA, MCOCA लावला. तुमचा विधानसभा लढवलेला सदस्य आहे. जो तीन वर्षांपासून जेलमध्ये आहे. खासदारांनी तिला हिनवलं. तु बीडची आहेस म्हणून हिणवलं. दम दिला आणि हाच निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल करतोय. फलटणमध्ये रक्षकच भक्षक बनले असल्याची टीकाही मेहेबुब शेख यांनी केलीय.
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी कशा पद्धतीने आगवणे कुटुंबाचा छळ केला हे सांगितले. यानंतर आता आगवणे कुटुंबातील वर्षा नामक मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरचा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुलगी खासदार साहेब मी आई-वडिलांचं काय चुकलं असेल तर माफी मागते हे सगळं थांबवा, अशी विनंती आणि विनवण्या करत आहे. तर सुसाईड नोटमध्ये देखील रणजीत निंबाळकरांसह अन्य काही लोकांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा दिगांबर आगवणे या मुलीने आणि तिच्या बहिणीने वडील दिगांबर आगवणे तीन वर्षांपासून जेलमध्ये असल्याने आणि आई देखील अनेक महिन्यांपासून घरी नसल्याने आणि मुलींना त्रास होत असल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
Mehboob Shaikh : माझ्या जीवाला धोका आहे हे मी मीडियासमोर सांगतोय : मेहेबुब शेख
माझ्या भावाकडे थकीत रक्कम राहिली होती. गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तीन कारखान्याच्या गाड्या आल्या आणि दरोडा टाकला. महिलांशी हुज्जत घालून खासदारांना आणि पीआय आटोळेंना फोन केला आणि मारहाण केली. दुसऱ्या वेळेस आले आणि भावाला उपळी स्टॅंडहून फलटणला घेऊन गेले. आम्ही व्यवहार मिटवण्यासाठी गेलो तर मला फलटणच्या बस स्टॅण्डवर एटीएम मधून पैसे काढले. तिथे दोन स्कॉर्पिओ गाड्या भरून आल्या. झाडाला पाय बांधायचे आणि मला मारहाण करायचे. माझं पूर्ण शरीर खिळखिळं केलेलं आहे.
त्यांनी कारखान्याच्या पुजारींनी माझं वाटोळं केलं आहे. मला भाजीमंडीतून उचलून नेऊन विमानतळावर नेऊन मारहाण केली. नंतर मला पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलीसने धमकी दिली. सकाळपर्यंत पैशाची तजवीज कर नाहीतर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल. मी त्यांना विनंती करत होतो माझे लेकरं लहान आहेत. मला जीव जाईपर्यंत मारू नका. मला मारहाण केलेला फोटो आहे माझ्याकडे. सगळ्यात अगोदर पुजारीला ताब्यात घ्या सगळं उघड होईल. माझ्या जीवाला धोका आहे हे मी मीडियासमोर सांगतोय. असे गंभीर आरोपही मेहेबुब शेख यांनी केलेय.
आणखी वाचा
























