Navi Mumbai : नवी मुंबई, ठाण्यात बत्ती गुल, प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल; वीजपुरवठा पूर्ववत कधी होणार?
Navi Mumbai Electricity : ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या अनेक तासांपासून वीज गायब झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
नवी मुंबई : एकीकडे उन्हाचा दाह (Heat Wave) वाढत असताा दुसरीकडे नवी मुंबईत अनेक तासांपासून बत्ती गुल झाल्याने (Navi Mumbai Electricity Crisis) नागरिक उकाड्याने अजूनच त्रस्त झाल्याचं दिसतंय. महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या काही तासांपासून वीज गायब झाल्याने नागरिक हैराण झाल्याचं दिसतंय.
नवी मुंबईच्या परिसरात गेल्या काही तासांपासून वीज पुरवठा होत नाही. या भागात सध्या वीजेची मागणी मोठी आहे, त्यामध्ये 750 मेगा वॅट वीज कमी पडताना दिसत आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्याने, वीजेच्या मागणी वाढल्याने लोड आल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येतयं.
अर्ध्या तासात वीज पुरवठा सुरळीत होणार
वीजेची मागणी आणि पुरवठा याचं गणित बिघडलं असल्याचं दिसतंय. ठाणे आणि नवी मुंबईत सध्या 4000 मेगा वॅटची मागणी आहे. पण तेवढा पुरवठा होत नाही. पण येत्या अर्ध्या तासात हा वीज पुरवठा सुरळीत होईल असं महापारेषणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यातील तापमानात मोठी वाढ
राज्यात पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात पारा तीन ते पाच अंश वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारा 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे. तर कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा 3 ते 4 अंशांनी वाढू शकतो. या काळात उष्णता निर्देशांक 40 ते 50 अंशांदरम्यान जाणवू शकतं. एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय, तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. मराठवाड्यात चार दिवसांच्या कालावधीत 3 ते 5 अंशांनी कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी तापमानाचा अंदाज जारी केला.
पाणी पिण्याचं आवाहन
कोकण विभागात आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होईल. त्यामुळे मुंबईकरांना तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. या कालावधीमध्ये दीर्घकाळ उन्हात राहू नये असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी, छत्री किंवा अन्य कपडा घेणेही अपेक्षित आहे.
ही बातमी वाचा: