एक्स्प्लोर

Navi Mumbai APMC : सलग चार दिवस मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळे महागणार? जीवनावश्यक गोष्टींचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता

Vashi APMC : चार दिवस एपीएमसी बंद असल्याने जीवनावश्यक गोष्टींची कमतरता निर्माण होऊन भाजीपाला, कांदा, बटाटा , फळे यांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नवी मुंबई: सलग चार दिवस नवी मुंबईतील एपीएमसी (Navi Mumbai APMC) बंद राहणार असल्याने जीवनावश्यक गोष्टींचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा आंदोलकांनी वाशीतील  एपीएमसीमध्ये दुसऱ्या दिवशी मुक्काम ठोकला असल्याने याचा मोठा परिणाम एपीएमसीच्या व्यवहारावर होणार असल्याचं सांगितलं जातंय. 

मराठा आंदोलनामुळे आधीच दोन दिवस एपीएमसी बंद आहे, त्यानंतर आता शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने सलग चार  दिवस एपीएमसीतील व्यवहार ठप्प राहणार आहेत. सलग चार दिवस एपीएमसी बंद राहणार असल्याने भाजीपाला , फळ , कांदा बाटाचा या जीवनावश्यक गोष्टींचा मुंबई आणि परिसरात कमतरता भासवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

जीवनावश्यक गोष्टींची कमतरता निर्माण होऊन भाजीपाला, कांदा, बटाटा , फळे यांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दोन दिवसांपासून बंद असलेले मार्केट हे शनिवारी सुरू होईल या शक्यतेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल नवी मुंबईच्या दिशेने पाठवल्याची माहिती आहे. त्यामुळे या गाड्यांमधील भाजीपाला उतरवण्यासाठी पंचायत होण्याची शक्यता आहे. 

गाड्या थेट मुंबई आणि ठाण्याच्या मार्केटमध्ये 

मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक गोष्टी मिळाव्यात  यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक वस्तू घेऊन एपीएमसी मार्केटमध्ये येणाऱ्या गाड्या या शनिवारी मार्केटमध्ये न आणता थेट मुंबई, ठाणे आणि इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात आणत त्या ठिकाणच्या मार्केटमध्ये सेवा पुरवण्यासाठी सरकारने मुभा दिली आहे. 

शेतकऱ्यांनी आपला शेतमाल हा पनवेलनंतर थेट एमटीएचएल मार्गे मुंबईत विविध भाजी मंडई आणि भाजी मार्केट पोहोचवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 

नवी मुंबईत मराठा आंदोलनामुळे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि माल वाहतूकदारांच्या शेतमाल व इतर खाद्यपदार्थांच्या वितरणासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व अधिनियम 1963 कलम 59 अन्वये तरतुदीमध्ये सूट देण्यात आली आहे. 

मनोज जरांगे यांच्या मागण्या काय काय? 

- नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या.
- शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. 
- कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना 100 टक्के शिक्षण मोफत करा.
-  जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
- आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा .
- आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
- SEBC अंतर्गत 2014 च्या नियुक्त्या त्वरित द्या .
- वर्ग 1 व 2 आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या.
- रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, आझाद मैदानात जात नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराटABP Majha Headlines :  7 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget