Eknath Shinde on PM Modi: मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर हल्लाबोल
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करत म्हटलं, “मोदी हात लावतात तिथं सोनं होतं.” शिंदे आणि अजित पवार यांनी मोदींच्या भूमिकेचं गौरवपूर्ण वर्णन केलं.

Eknath Shinde on PM Modi: नवी मुंबई विमानतळाच्या (Navi Mumbai Airport inauguration) उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Maharashtra visit) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde praise for Modi)पंतप्रधान मोदी यांचे वर्णन लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री असा मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाते, असे शिंदे म्हणाले. मोदी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकीन है असेही शिंदे म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा स्थगिती सरकार असा उल्लेख करत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
मोदीजींचा हात जिथे लागतो, त्याचे सोने होते (Eknath Shinde on PM Modi)
विमानतळाच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, आठ वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड एअरपोर्टचे भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झाले होते आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचे लोकार्पण होत आहे. मोदीजींचा हात जिथे लागतो, त्याचे सोने होते. याचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रगती आणि विकास नेहमी सोबत येतात आणि जेव्हा उड्डाणाची गोष्ट येते, तेव्हा आपल्याला मोदीजी आठवतात, असेही शिंदे म्हणाले. विमानतळ नव्या भारताच्या संकल्पाचा आणि पंतप्रधान मोदीजींच्या महाराष्ट्रावरील विश्वासाचा एक प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार (Ajit Pawar on PM Modi)
दरम्यान, अजित पवार यांनीही आपल्या भाषणात मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, मोदींच्या हस्ते महाराष्ट्राच्या, विशेषत: मुंबईच्या विकासाला नवे पंख देणाऱ्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे, हा ऐतिहासिक क्षण आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींची नेहमी साथ, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आले आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने मुंबईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमधून विकास, सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्रीचा प्रभावी संगम होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईलाच नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळामुळे प्रवासासोबतच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास काही सोपा नव्हता. जमीन संपादनापासून ते विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यात प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर समोर उभा होता. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने प्रत्येक अडथळ्यावर मात केली. यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या तात्काळ मिळत गेल्या. हे सर्व मोदी साहेब आणि केंद्र सरकार ठामपणे मागे उभे होते यामुळे शक्य झाले.
इतर महत्वाच्या बातम्या

















