Mumbai Local Train : पनवेल ते सीएसटी रेल्वे मार्गावर बिघाड, हार्बर मार्गावरील गाड्या उशीराने धावणार
Mumbai Local Train : रेल्वे मार्गावर बिघाड झाल्याने पनवेल ते सीएसटी हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या उशीराने धावणार आहेत.
Mumbai Local Train : पनवेल ते सीएसटी हार्बर रेल्वे मार्गावर बिघाड झालेला आहे. बिघाड झाल्यामुळे रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनीट उशीराने धावणार आहेत. केबलमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे उशीरा धावत आहेत. दोन्ही मार्गिकेवरून लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिट उशीरा धावत आहेत. पनवेल ते सीएसटी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेलजवळ तांत्रिक बिघाड झालेला आहे. दोन्ही मार्गिकेवरुन सध्या लोकल 15 ते 20 मिनीटं उशीरा धावत आहेत. केबल दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.
अधिकची माहिती अशी की, पनवेल सीएसटी रेल्वे मार्गावर गेल्या काही वेळापासून बिघाड झालेला आहे. पनवेल रेल्वे स्थानकावर केबलमध्ये बिघाड झालेला आहे. दोन्ही मार्गावरील गाड्या काही वेळासाठी बंद होत्या. दरम्यान, आता केबलचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या पनवेल वरुन सीएसटी आणि सीएसटीवरुन पनवेल या दोन्ही गाड्या सध्या सुरु आहेत. मात्र, सध्या 15 ते 20 मिनीटाने या गाड्या उशीराने धावत आहेत.
पनवेल ते सीएसटी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल जवळ बिघाड
केबल मध्ये बिघाड झाल्याने रेल्वे उशीरा धावत आहेत
दोन्ही मार्गीकेवरून लोकल ट्रेन 15 ते 50 मिनिट उशीरा धावत आहेत.
केबल दुरूस्तीचे काम सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या