एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ragging in Dental Collage : आधी जबरदस्तीने दारु पाजली, मग पॅन्टमध्येच लघवी करायला लावली, नवी मुंबईच्या डेंटल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार 

Navi Mumbai News : नवी मुंबईतील एमजीएम डेंटल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार विद्यार्थ्यांविरोधा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai Student ragging : नवी मुंबईतील (Navi Mumbai) कामोठे येथील एमजीएम डेंटल कॉलेजध्ये (MGM Dental Collage) चार विद्यार्थ्यांनी मिळून एका ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग (Ragging) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबधित चारही विद्यार्थ्यांवर ज्युनिअर विद्यार्थ्याची रॅगिंग (Student Ragging) केल्याप्रकरणी कामोठे पोलिसांकडून (Kamothe Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, चार जणांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला आधी दारू प्यायला लावली आणि नंतर स्वत:च्याच पँटमध्ये लघवी करण्याची जबरदस्ती केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले देखील केले आहे.

नेमकं काय घडलं?

संबधित घटना ही जुलै महिन्यामध्ये घडली होती, परंतु पीडित मुलाने आतापर्यंत याबाबत माहिती दिली नव्हती. अखेर आता त्याने आपल्यासोबत झालेल्या छळाची  माहिती पालकांना दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला पीडित विद्यार्थी कामोठे येथे आपल्या 3 साथीदारांसह राहत होता. याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटवर तिसऱ्या वर्षात शिकत असेलेले विद्यार्थी राहत होते. या चारही सीनियर विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांना त्यांच्या फ्लॅटवर येण्यास सांगत त्यांना दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित तरुणाला लघवीला आली असता त्याला लघवी करण्यापासून रोखत त्याला अधिक पाणी पाजून लघवी रोखून धरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पॅन्टमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला.

चारही जणांवर गुन्हा दाखल

वरील संपूर्ण घटनेबद्दल पीडित विद्यार्थाने पालकांना कळवल्यानंतर कॉलेजपर्यंत ही गोष्ट पोहोचली. ज्यानंतर कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने ही  तक्रार पोलिसांमध्ये केल्यानंतर कामोठे पोलिसांनी चारही विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कामोठे पोलिसांनी चौघांविरुद्ध महाराष्ट्र छळ प्रतिबंधक कायदा 1999 (4) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 01 December 2024Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget