(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
विधानसभेत महायुतीला मिळालेलं यश हे निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनीही मिळून केलेल्या पापाचे फळ आहे. असं पटोले म्हणाले होते.
BJP on Nana Patole: नाना पटोले निष्क्रिय आहेत. त्यांच्या कार्यपद्धती आणि वागणुकीवर काँग्रेस पक्षातील नेते नाराज होते. लोकसभेच्या तिकीट विकण्याच्या आरोप पटोले यांच्यावर झाले. ईव्हीएमवर शंका आहे तर त्यांनी बॅलेटवर पुन्हा निवडणूक लढवावी. आता ही निवडणूक झाली तर भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर निवडून येतील असं उत्तर भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नाना पटोलेंना उत्तर दिलय.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश आलेलं आहे तो लाडक्या बहिणींचा प्रभाव नव्हता. हा सगळा प्रभाव निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनीही मिळून केलेल्या पापाचे फळ आहे. महाराष्ट्रात जनतेचं सरकार नं येता निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेलं भाजपचं सरकार येतंय. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश आहे. असं पटोले म्हणाले होते.
पाच वर्ष मतदारसंघाशी सबंध न ठेवता आता ईव्हीएमवर दोष
लोकसभेत यश मिळाले तेव्हा दोष EVMवर व्यक्त केला नाही, अनेक राज्यात निवडणूका झाल्यात,पण विधानसभेत आज EVM हॅक होऊ शकतात असे आरोप करत आहे. असं म्हणत भाजपच्या परिणय फुके यांनी नाना पटोलेंवर पलटवार केलाय. ईव्हीएम कॅल्यूलेटर सारखी मशीन आहे, ती हॅक होऊ शकत नाही, जनतेने नाकरले असल्यानं दोष EVM ला देत आहे. या पुर्वी नाना पटोले 5 हजर मतांनी निवडून आले होते, यावेळी 208 मतांनी निवडून आले, पाच वर्ष मतदारसंघाशी सबंध न ठेवता आता ईव्हीएमवर दोष देत आहे.असंही ते म्हणाले.लोकसभेत मतदार यादीत घोळ होता, मतदान कमी झाले, सुट्टीचे ही दिवस होते, पण यावेळी मोठया संख्यने मतदार बाहेर आले. प्रत्येक बुथवर चर्चा होती. मतदान दिवशी पटोले किती बूथ वर फिरले... नाना पटोले निष्क्रीय आहे, त्यांची कार्यपद्धती वागणूकीवर कॉंग्रेस पक्षातील नेते नाराज होते, लोकसभेच्या तिकीट विकण्याचे आरोप पटोले यांच्यावर झाले, लोकसभेच्या तिकीट विकण्याचे आरोप पटोले यांच्यावर झाले, बंटी शेळकेला नोटीस दिली, त्यांच्या पक्षात कोणाला बोलण्याचा अधिकार नाही हे यातून दिसून येते. असंही फुके म्हणाले.
फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे:परिणय फुके
मलाही मिडीयातून शपथविधी बद्दल कळलं, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, महायुती म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वात यश मिळालं आहे. कोण मंत्री असतील त्यावर पक्षश्रेष्ठीं निर्णय घेतील, त्यावर मी काही बोलू शकणार नाही. असे आमदार फुके म्हणाले.