एक्स्प्लोर

पहिला दरोडा टाकला, दुसऱ्याच्या तयारीत असताना दरोडेखोरांना पकडलं; पोलिसांची जबरदस्त कामगिरी

आठ आरोपी हे पुन्हा अंबरनाथ शहरातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका राजकीय व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

उल्हासनगर : गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास उल्हासनगर शहरातील (Ulhasnagar Crime News) एका सिंधी पुजाऱ्याच्या घरात घुसून लहान मुलीच्या गळ्यावर चॉपर ठेवत लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेवर दरोडा टाकून गुन्हेगार चार चाकी गाडीतून पळून गेल्याची घटना घडली होती. ही सर्व घटना शेजारच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुख्य आरोपी शिवा निंबाळकर याच्यासह चार जणांना विविध ठिकाणाहून अटक केली होती. तसेच उल्हासनगर आणि कल्याण क्राईम ब्रांचच्या शाखेने देखील या प्रकरणात चार आरोपी अटक केले होते. दरम्यान अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी करत असताना सदर आठ आरोपी हे पुन्हा अंबरनाथ शहरातील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या एका राजकीय व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

जॅकी कोंडूमल जग्यासी हे कॅम्प 4 मधील श्रीराम चौक येथील स्वामी दमाराम दरबारचे पुजारी आहेत. त्यांच्या घरी मंगळवारी भल्या पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास दरबार मधील घरी सशस्त्र दरोडा पडला आहे. सहा ते सात दरोडेखोर तलवारी चॉपर घेऊन त्यांच्या घरात घुसले, त्यांनी घरातील चिराग आणि जॅकी यांना मारहाण केली. जॅकी यांची सात वर्षीय मुलगी जिया हिच्या गळ्यावर तलवार आणि चॉपर ठेवली. जीवे ठार मारण्याचा धाक दाखवत आरोपीनी घरातील तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीचे  दागिने आणि 80 हजार रुपयांची रोकड चोरी करून धूम ठोकली होती. विशेष म्हणजे जग्यासी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर देखील या दरोडेखोरांनी आपल्या सोबत नेला होता.

दरोडाची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, मधुकर कड आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र हा सशस्त्र दरोडा असल्याने कल्याण गुन्हे शाखा, ठाणे गुन्हे शाखा त्याचबरोबर उल्हासनगर गुन्हे शाखा या घटनास्थळी दाखल होत समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक मौराळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून काही पुरावे मिळतात का ? याचा पोलीस तपास करत होते.

दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला या प्रकरणात चार आरोपी अटक करण्यात यश मिळाले होते. मुख्य आरोपी शिवा निंबाळकर, अनिल दुधानी, सुनील कुरणे आणि राजकुमार कुरणे अशी अटक केलेल्या आरोपीची नावे असून सर्व आरोपी अंबरनाथमध्ये राहत असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच एक आरोपी कर्नाटक, दोन आळेफाटा आणि एक आरोपी अंबरनाथ येथून अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, महेंद्र सपकाळे, प्रियांका सादळकर, रामदास मिसाळ, जितेंद्र चित्ते, पांडुरंग पथवे, समीर गायकवाड, गणेश राठोड, कृपाल शेकडे, गणेश डमाळे, हनुमंत सानप, मंगेश वीर यांच्यासह पोलीस पथकाने महत्वाची भुमिका बजावली होती. 

दुसरीकडे उल्हासनगर आणि कल्याण शाखेच्या क्राईम ब्रांच पथकाने देखील या दरोड्याच्या गुन्ह्यात अकबर खान, असिफ शेख, शिवसिंग शिकलकर, राहुलसिंग जुनी यांना अटक करून विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अटक करण्यात आलेल्या आठ ही आरोपीची कसून चौकशी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक करत होते. या चौकशी दरम्यान सदर आरोपी हे अंबरनाथ शहरातील एका व्यवसायाने डॉक्टर असलेल्या राजकीय व्यक्तीच्या घरी दरोडा टाकणार असल्याचे त्यांनी कबूल केले. यासाठी त्यांनी तेथील परिसराची रेकी देखील केली असल्याचे पोलिसांना सांगितले. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या या सतर्कतेमुळे घडणारा गुन्हा टाळल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्ट पद्धतीने गुन्ह्याचा तपास करून आरोपी अटक केल्याप्रकरणी त्यांना 35 हजार रुपयांचे रिवॉर्ड तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget