Mumbai News : मुंबईतील मुलींच्या शासकीय वसतिगृहातून 6 अल्पवयीन मुलींचे पलायन, स्वच्छतागृहाच्या खिडकीतून पळाल्या
Mumbai News : सुत्रांच्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे, या अल्पवयीन मुलींनी पळून जाण्यापूर्वी गार्ड कॉन्स्टेबलच्या खोलीचे गेट बाहेरून बंद केले होते.
Mumbai News : मुंबईतील गोवंडी (Gowandi) परिसरात असलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहातून (Girls Hostel) स्वच्छतागृहाची खिडकी आणि ग्रील तोडून सहा मुली पळाल्याची घटना घडली. सुत्रांच्या माहितीनुसार, काल 11 सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना ही घटना घडली, काय घडले नेमके?
गार्ड कॉन्स्टेबलच्या खोलीचे गेट बंद केले
सुत्रांच्या माहितीनुसार, धक्कादायक बाब म्हणजे, या अल्पवयीन मुलींनी पळून जाण्यापूर्वी गार्ड कॉन्स्टेबलच्या खोलीचे गेट बाहेरून बंद केले होते. याचं कारण म्हणजे, या मुलींच्या पलायनाची माहिती कॉन्स्टेबलली मिळाली असतील तर त्या मुलींचा पाठलाग करत त्यांना पकडले असते.
मुंबई पोलिसांना दिली माहिती
मुलींच्या पलायनाची बातमी जेव्हा वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली तेव्हा त्यांनी या घटनेचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वसतिगृहात येथे राहणाऱ्या प्रत्येक महिलेची नोंद केली जातो आणि रेकॉर्डनुसार 6 मुली बेपत्ता असल्याचे दिसून आले, तेव्हा वसतिगृहातील कोणत्या मुलींनी पलायन हे समजण्यास मदत झाली. ही माहिती मिळताच वसतिगृहातील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गोवंडी पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून संबंधित मुलींचा शोध सुरू आहे. माहितीनुसार, विविध तपास यंत्रणांकडून मानवी तस्करी, भिकारी (भीक मागणे) अशा बेकायदेशीर काम करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येते आणि तेथे सापडलेल्या अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना गोवंडीच्या वसतिगृहात ठेवले जाते.
या घटनेमागे कोणाचा हात?
पोलीसांच्या माहितीनुसार, वसतिगृहातून पळालेल्या मुलींची ओळख पटवली असून, त्यांची सुटका नेमकी कोठून झाली? याचा तपास करत आहोत, याशिवाय त्यांच्याशी संबंधित कोणी असेल तर त्यांची चौकशी करण्यात येईल तसेच गोवंडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येईल. जेणेकरून त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली की त्या एकट्याच पळून गेल्या? याबाबत पोलीस तपास करत आहेत.