Navi Mumbai Crime : नवी मुंबई सीवूड्स भागात बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा
नवी मुंबईच्या (Navi Mumbai News) उलवे भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची सीवूड सेक्टर-44 मधील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Navi Mumbai Crime : नवी मुंबई : नवी मुंबईच्या (Navi Mumbai) उलवे (Ulwe) भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची (Construction Professional) त्याच्याच कार्यालयात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे.
नवी मुंबईच्या (Navi Mumbai News) उलवे भागात राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाची सीवूड सेक्टर-44 मधील त्याच्या कार्यालयात डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. मनोज सिंह (वय 39) असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. शनिवारी (14 जानेवारी 2024) सकाळी 11 वाजताच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एखाद्या जवळच्याच व्यक्तीनं बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह याची हत्या त्याच्या जवळच्याच व्यक्तीनं केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांच्यावर फसवणूक केल्याचे तीन गुन्हे आधीपासूनच दाखल करण्यात आले आहेत.