एक्स्प्लोर

Beed News : वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा; भीम आर्मी संघटनेची खळबळजनक मागणी 

Beed News : वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा, अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. 

Beed News : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपास सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात केज कोर्टात आज सुनावणी करण्यासाठी सीआयडी तर्फे विनंती केली असता, न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडसाठी आजचं केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.  संध्याकाळी  7.30 नंतर सुनावणीसाठी सीआयडीने विनंती केली होती. या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा, अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. 

हा सगळा आधीच रचलेला प्लॅन 

बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे हत्या प्रकरणाने सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर (Walmik Karad) आरोप होत आहे. वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. मात्र, आज अचानक वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात येत शरणागती (Walmik Karad Surrender) पत्करली. तर दुसरीकडे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता यावर भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अशोक कांबळे यांनी ही खळबळजनक मागणी केली आहे. 
संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळताना दिसतं नाहीये, कराड नावाचा व्यक्ती लपला कुठे होता? आम्हाला माहिती आहे की तो बीडमध्येच होता. पोलिसांच्या 50 गाड्या काल बीडमध्ये फिरत होत्या. याचं लोकांनी त्यांना पुण्यापर्यंत नेले, हा सगळं आधीच रचलेला प्लॅन होता. असा दावाही त्यांनी केला आहे.

भर रस्त्यामध्ये आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे- अशोक कांबळे  

हे सरकार वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी काम करतंय. संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत नाहीये. लवकरच आम्ही देशभरातील अन्यायग्रस्त लोकांना बोलावणार आहोत. आझाद मैदनवर निषेधार्थ आम्ही सभा घेऊ. यंत्रणा जर खरंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काम करत असतील तर आतापर्यंत वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर झाला असता. जे जे आरोपी या प्रकरणात आहेत, त्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. भर रस्त्यामध्ये आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे,  जे पोलीस हे कृत्य करतील त्यांचे संरक्षण आम्ही करू. जनता कायदा हातात घेणार नाही, जनतेला कायद्याने न्याय मिळवून घ्यायला येतो. असेही अशोक कांबळे म्हणाले. 

हेही वाचा

Walmik Karad: 23 दिवस पोलिसांना गुंगारा, शरण येण्याची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवलं; वाल्मिक कराडांच्या शरणागतीनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Embed widget