एक्स्प्लोर
स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्सवर नाशिकमध्ये बंदी येण्याची शक्यता
तिन्ही कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 7 दिवसात त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

नाशिक : स्विगी, झोमॅटो आणि उबर इट्स या कंपन्यांवर नाशिकमध्ये बंदी येण्याची शक्यता आहे. कारण अन्न औषध प्रशासनाने त्यांना नोटीस बजावली असून 7 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नसल्याने ही कारवाई होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये खाद्यपदार्थांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या स्वीगी, झोमॅटो आणि उबर इट्सवर या कंपन्यांनी डिलिव्हरी बॉईज ठेवले आहेत. एकट्या नाशिकमध्येच या कंपन्यांचे जवळपास साडेतीन हजार डिलिव्हरी बॉईज काम करत आहेत. मात्र त्यांच्याकडे अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुठलेही प्रमाणपत्र नाही. डिलिव्हरी बॉईज अन्न सुरक्षितरित्या पोहोचवतात का? याबाबत साशंकता आहे. तो निरोगी आहे का? त्याचे वाहन कसे आहे? त्याने वैद्यकीय तपासणी केली आहे का? हे सर्व पडताळून बघण्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित कंपन्यांची असून अन्न औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत या कुठल्याही बाबींची पूर्तता केली जात असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे उबर इट्स, झोमॅटो आणि स्विगी या तिन्ही कंपन्यांना अन्न व औषध प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 7 दिवसात त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न केल्यास अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता पडल्यास त्यांची मान्यता देखील रद्द केली जाणार असल्याच प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या कंपन्यांवर बंदी आल्यास या सर्व डिलिव्हरी बॉईजवर उपासमारीची वेळ येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























