एक्स्प्लोर
माझा इॅम्पक्ट : सहा बोटं असलेल्या तरुणाला अखेर आधारकार्ड मिळणार!
केवळ हाताला ६ बोटं आहेत म्हणून नाशिकच्या गुरुदयाल त्रिखा या तरुणाला गेले अनेक दिवस आधारकार्ड मिळत नव्हतं. एबीपी माझानं याबाबतचं वृत्तही दाखवलं होतं. या वृत्तानंतर आता तरुणाच्या आधार कार्डचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : केवळ हाताला ६ बोटं आहेत म्हणून नाशिकच्या गुरुदयाल त्रिखा या तरुणाला गेले अनेक दिवस आधारकार्ड मिळत नव्हतं. एबीपी माझानं याबाबतचं वृत्तही दाखवलं होतं. या वृत्तानंतर आता तरुणाच्या आधार कार्डचा मार्ग मोकळा झाला आहे.
६ बोटं असल्यानं गुरुदयालच्या बोटांचं स्कॅनिंग होत नसल्याचं त्यांला सांगण्यात येत होतं. त्यासाठी अपंगांच्या रांगेत जा असे सल्लेही या तरुणाला दिले गेले. गेल्या वर्षभरापासून हा तरुण आधारकार्ड केंद्राचे खेटे मारत होता. अखेर एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवली आणि प्रशासनाला जाग आली.
अखेर आधारकार्डच्या नोंदणी केंद्राकडून गुरुदयालची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळं आता लवकरच गुरुदयालला आधारकार्ड मिळणार आहे. सध्या सर्व महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्डची विचारणा केली जाते.
संबंधित बातम्या :
हाताला सहा बोटं असल्यानं आधार कार्ड मिळेना, तरुणाची ससेहोलपट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement