एक्स्प्लोर

आदिवासी विकास विभाग बनावट वेबसाईट प्रकरणी जळगावातून एकाला अटक

आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाईट बनवून उमेदवारांना गंडा घातल्याची बातमी एबीपी माझानं मागील आठवड्यात दाखवली होती. याची दखल घेत नाशिक सायबर सेल पोलिसांनी एकाला जळगाव जिल्ह्यातून अटक केलीय.

नाशिक : आदिवासी विकास विभागाची बनावट वेबसाईट बनवून उमेदवारांना गंडा घातल्याची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट वेबसाईट तयार करणाऱ्या भामट्याला नाशिक पोलिसांनी अटक केलीय. मागील आठवड्यात व्हाट्सएप, इन्स्टाग्रामवर आदिवासी विभागात नोकर भरती असल्याची जाहिरात व्हायरल झाली होती. ही जाहिरात खोटी असल्याची बातमी एबीपी माझाने पहिल्यांदा दाखवली होती. या बातमीची दखल घेत नाशिक सायबर ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या वेबसाइटवरील मजकूर हा मुख्य आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वेबसाइटप्रमाणे तयार करण्यात आला होता. त्यामुळे ही वेबसाइट खरी आहे की बनावट हे कुणाच्या लक्षात आलं नाही. या बनावट वेबसाइटमध्ये माहिती देताना 3 हजार 199 जागांसाठी नोकर भरती असून सिव्हिल इंजिनिअर, इलेक्ट्रिक इंजिनीअर 8, सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट, सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, शिपाई अशा 6 विभागांध्ये भरतीची जाहिरात काढण्यात आल्याची खोटी माहिती देण्यात आली होती. या प्रकरणाचा पहिल्यापासून एबीपी माझाने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आलंय कारण नाशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आलीय. आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात व्हायरल जितेंद्र तायडे असे या प्रकरणी अटक केलेल्या संशियत आरोपीचे नाव आहे. जितेंद्र याला नाशिक सायबर सेल पोलिसांनी अटक जळगाव जिल्ह्यातून अटक केलीय. एबीपी माझाने वृत्त प्रसारित केल्यानंतर पोलिसांनी तीन पथक आरोपीच्या शोधासाठी रवान केली होती. संशयित आरोपी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असल्याची माहिती मिळालीय. दरम्यान, यात मोठं रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. काय आहे प्रकरण? मागील आठवड्यात आदिवासी विकास विभागात नोकर भरती असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या जाहिरातीची लिंक ओपन केल्यावर एक बनावट वेबसाइट ओपन होत होती. आदिवासी विकास आयुक्तालयाच्या नावाने ही जाहिरात फिरत होती. मात्र, अशी कोणतीही भरत होत नसल्याची माहिती आदिवासी विभागाकडून देण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. ही लिंक ओपन करुन अनेकांनी अर्ज भरले असून त्यासाठी शुल्कही भरल्याची माहिती आहे. त्यामुळे यापाठीमागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Fake ADVT | आदिवासी विभागाच्या नावानं नोकरभरतीची खोटी जाहिरात

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Nashik Crime: पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget