एक्स्प्लोर
बोबडं बोलल्याने चिमुकल्याला सावत्र पित्याकडून 40 चटके
आरोपीने पत्नीला मारहाण करुन घराबाहेर हाकललं. त्यानंतर झोपलेल्या मुलाला डास मारण्याच्या अगरबत्तीचे 40 चटके दिले.
नाशिक : साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याला सावत्र पित्यानं अगरबत्तीचे चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलगा बोबडा बोलतो, या रागातून त्याने सावत्र मुलाला चटके दिल्याची धक्कादायक माहिती आहे. नाशकातल्या गोंदे गावात ही घटना घडली आहे.
हेमंत राऊत असं अत्याचार करणाऱ्या पित्याचं नाव असून तो घटनेनंतर फरार आहे. आरोपी हेमंत त्याची दुसरी पत्नी आणि तिच्या मुलासह गोंदेफाटा परिसरात राहतो. काल रात्री त्यानं पत्नीला मारहाण करुन घराबाहेर हाकललं. त्यानंतर झोपलेल्या मुलाला डास मारण्याच्या अगरबत्तीचे 40 चटके दिले.
दुसऱ्या दिवशी पत्नी घरी आल्यावर तिला मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. तिनं थेट मुलाला घेऊन जिल्हा रुग्णालय गाठलं. उपचारानंतर मुलगा शुद्धीवर आला आहे. पोलिस फरार सावत्र पित्याचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement