एक्स्प्लोर
Advertisement
छापेमारीनंतर रखडलेला कांदे लिलाव आज सुरु होण्याची चिन्हं
आयकर विभागाच्या छाप्यानंतर बंद झालेला कांदे लिलाव आज सुरु होण्याची शक्यता आहे.
नाशिक: नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज सुरु होण्याची शक्यता आहे. लासलगाव वगळता जिल्ह्यातील इतर कांदा बाजारात व्यवहार सुरु होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांची एक बैठकही घेण्यात आली. यानंतर छाप्यानंतरचा वाद थोडा निवळलेला दिसतोय. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्व व्यापाऱ्यांना लिलाव सुरु करण्याचं आवाहन केलं.
मात्र तरीही आज लासलगाव बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याचं कळतंय.
कांदा व्यापाऱ्यांचं हवाला कनेक्शन?
नाशकातील साठेबाज कांदा व्यापाऱ्यांनी दुबई हवालामार्फत काळ्याचं पांढरं केल्याचा संशय आता निर्माण होतोय. दुबईतून कांदा निर्यातीच्या नावाखाली पैसे आणले- गेले. मात्र कांदे निर्यात झालेच नसल्याचा संशय ईडीला आहे. तसंच 3 टक्के व्याजदरानं पैसे देण्याचा उद्योगही काही जण करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. नाशकातील 7 बड्या व्यापाऱ्यांनी कांद्याची साठेबाजी करत कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप आहे.
7 कांदे व्यापाऱ्यांवर 120 आयकर अधिकाऱ्यांची धाड, दर घसरले
नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाच्या 120 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून गुरुवारी 7 व्यापारी, 25 घरं, गोदामं आणि कार्यालयाची झाडाझडती सुरु करण्यात आली. साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवणाऱ्या व्यापाऱ्यांना वेसण घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
या छापेमारीमुळे व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. या छाप्यानंतर नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले. गुरुवारपासून0 पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहिली.
संबंधित बातम्या
7 कांदे व्यापाऱ्यांवर 120 आयकर अधिकाऱ्यांची धाड, दर घसरले
साठेबाज कांदा व्यापाऱ्यांचं दुबई हवाला कनेक्शन, ईडीला संशय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement