नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांची बदली, डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर नवे आयुक्त
Nashik Municipal Corporation : मार्च 2022 मध्ये रमेश पवार यांची नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून नियूक्ती करण्यात आली होती. परंतु, अवघ्या चारच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली.
![नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांची बदली, डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर नवे आयुक्त nashik municipal corporation commissioner ramesh pawar transfer नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार यांची बदली, डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर नवे आयुक्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/22/2f057261ba0b83a25170078595599a811658510327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : काही महिन्यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) आयुक्तपदी विराजमान झालेले रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मार्च 2022 मध्ये रमेश पवार यांची नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून नियूक्ती करण्यात आली होती. परंतु, अवघ्या चारच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली. पवार यांच्या जागी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या चार महिन्यांतच पवार यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रमेश पवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही काळ ते मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी होते. त्यांनतर ठाकरे यांनी त्यांची नाशिकला बदली केली होती. मात्र चार महिन्यांतच पवार यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय शिंदे सरकारने हा निर्णय घेतल्याने ठाकरेंना दणका दिल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत डॉ. पुलकुंडावर?
डॉ. पूलकुंडावर हे 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे सह व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुलकुंडावर हे एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
सातारा आणि सांगलीला नवे जिल्हाधिकारी
नाशिकसह सातारा आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी रुचेश जयवंशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Vidya Chavan VS Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या छळवादी सासू, माझ्या नादी लागू नका, विद्या चव्हाणांचं जशास तसं उत्तर
Sanjay Raut : सकाळी उठायचं, कॅमेऱ्यासमोर येऊन बसायचं, एवढेच काम; संजय राऊतांना हेमंत गोडसेंचा टोला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)