एक्स्प्लोर

Vidya Chavan VS Chitra Wagh : चित्रा वाघ म्हणाल्या छळवादी सासू, माझ्या नादी लागू नका, विद्या चव्हाणांचं जशास तसं उत्तर 

Vidya Chavan VS Chitra Wagh : पुन्हा माझ्या नादी लागू नका, नाहीतर तोंडावर आपटाल, असा धमकी वजा इशारा दोन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना दिला होता. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या इशाऱ्याला ट्विटरच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे.    

मुंबई : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. तुमच्या नादी लागणारे लंपट असतात. त्यातले आम्हाला समजू नका. चित्राताई, वारंवार "छळवादी सासू" खोटा अपप्रचार तुम्ही करता. छळ केलाच नाही तर होणार कुठून हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. पण तरीही खोटा नाटा पुरावा तरी खुलेआम सादर करा, असे आव्हान विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना केले आहे. 

पुन्हा माझ्या नादी लागू नका, नाहीतर तोंडावर आपटाल, असा धमकी वजा इशारा दोन दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना ट्विटरवरून दिला होता. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी आता चित्रा वाघ यांच्या इशाऱ्याला ट्विटरच्या माध्यमातून प्रत्यूत्तर दिले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलचं ट्विटर वॉर सुरू झालं आहे. 

काय म्हणाल्या विद्या चव्हाण?
चित्रा वाघ यांनी 19 जैलै रोजी ट्विट करून विद्या चव्हाण यांना छळवादी सासू असे म्हटले होते. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी त्यांना आज प्रत्यूत्तर दिले आहे. "चित्राताई, वारंवार "छळवादी सासू" खोटा अपप्रचार तुम्ही करता...!  छळ केलाच नाही तर होणार कुठून हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे...! पण तरीही खोटा नाटा पुरावा तरी खुलेआम सादर करा, असे आवाहन विद्या चव्हाण यांनी केले आहे. 

विद्या चव्हाण यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, " पुरावा सादर करा नाहीतर तुमच्या खोटारडेपणाचे, इथपर्यंत कसे पोहोचलात, त्यासाठी...! काय काय केले, कोणा कोणाशी संधान साधलं...! हे माहिती आहे. हिम्मत असेल तर या...! "नादी लागू नका", पुन्हा मला धमकी...! तुमच्या नादी लागणारे "लंपट" असतात"...! त्यातले आम्हाला समजू नका."

"सत्याची खडतर वाट चालत असताना पदोपदी अनेक अडथळे आले...! पण न डगमगता इथवर पोहोचले...! तुमचा खोटारडेपणा "सत्याशी" सामना करू शकत नाही...! हेच खरं, असा निशाणा विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर साधला आहे. 

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
फक्त नाव “विद्या”असून विद्या येत नाही हो, सोलापूर प्रकरणात ना पीडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिलं. पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की टाळ्याला लावण्याची घाईचं फार. बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का? पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. 

महत्वाच्या बातम्या

मला घाण भाषेत बोललं जातंय, मेसेज केले जात आहेत, प्रश्न विचारला ही माझी चुकी आहे का? : चित्रा वाघ 

चित्रा वाघ यांच्याकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा 'तो' व्हिडीओ ट्वीट; पटोले न्यायालयात 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget