Nashik News : कोटींच्या संपत्तीसाठी सुफी धर्मगुरू झरीफ बाबाची हत्या, नाशिक ग्रामीण पोलिसांकडून तिघांना अटक
येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात 5 जुलै रोजी निर्वासित नागरिक असलेल्या झरीफ बाबा चिस्ती यांचा खुनाची घटना घडली होती. या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात येवला पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : येवला तालुक्यातील झरीफ बाबा चिस्ती याच्या हत्येप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून या घटनेत एकूण चार संशयित आरोपींना अटक केल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान नाशिक ग्रामीणचे अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली.
येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात 5 जुलै रोजी निर्वासित नागरिक असलेल्या झरीफ बाबा चिस्ती यांचा खुनाची घटना घडली होती. या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात येवला पोलिसांना यश आले आहे. धर्मगुरू चिस्ती यांची हत्या करून त्यांच्या शिष्याच्या नावे जमा असलेली जमीन कार व रोकडे आपल्या नावावर करून घेण्यासाठी हा कट रचल्याचे तिघांनी कबूल केले आहे.
येवल्याजवळील चिंचोडी एमआयडीसी शिवारात एका प्लॉटवर धार्मिक पूजा करून निघालेला सुपीक्वाजा सय्यद चिस्ती या धर्मगुरूची हत्या करून त्यांच्या काळसह आरोपी फरार झाले होते. धर्मगुरूच्या हत्येनंतर तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या घटनेवेळी चिस्ती यांचे सेवेकारी अफजल अहमद खान यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला होता. घटनेनंतर सर्व संशयित आरोपी हे फरार झाले होते.
दरम्यान आज पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत याप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संशयित आरोपी गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड व उर्फ पाटील रवींद्र चांगदेव तोरे आणि पवन पोपट आहेर अशी अटक करण्यात आलेली तिघांची नावं आहेत. घटनेत वापरलेली कार दुसऱ्या दिवशी संगमनेर शहरात आढळून आली होती. त्यावरून पुढील तपास केला असता संशयित आरोपी हे ठाणे मुंबई परिसरात गेल्या असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी खबऱ्यामार्फत माहिती कळवली. तीनही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आणि येवला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर संशयित आरोपींची विशेष चौकशी केली असता त्यांनी कबुल केले की, चिंचोडी परिसरात एका प्लॉटचे भूमिपूजन करण्याच्या बहाण्याने झरीफ बाबा यांना बोलावून घेऊन भूमिपूजन केले. भूमिपूजन झाल्यानंतर चिस्ती हे कारमध्ये बसत असताना आरोपींनी त्यांच्या डोक्यावर गोळीबार करून त्यांना ठार केले.
संपत्तीसाठी झरीफ बाबाची हत्या
चिस्ती यांचे लाखो भक्त असून मोठी संपत्ती जमा झाली होती. तसेच सेवेकरी गफार अहमद खान यांच्या नावावर घेतलेली जमीन, कार व रोख रक्कम ही आपल्या नावावर करून घेण्याचा या तिघांचा कट होता. यात रवींद्र तोरे हा झरीफ बाबांचा चालक देखील समाविष्ट होता.
नेमकं प्रकरण काय?
झरीफ बाबा या नावाने भारतात चार वर्षांपासून वास्तव्यास असलेला अफगाण नागरिक होता. तो गेल्या दीड वर्षांपासून सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात राहत होता. बुवाबाजीतून त्याने बक्कळ मालमत्ता जमवली होती. या संपत्तीवर त्याच्या ड्रायव्हरसह तिघांचा डोळा होता. यातून झरीफ बाबा यांची येवला तालुक्यात प्लॉट च्या भूमीपूजनाला बोलावून तिघांनी हत्या केल्याचे समोर आले आहे.