एक्स्प्लोर
नाशिकमध्ये बससेवा सुरु, इंटरनेट मात्र अद्याप बंदच
नाशिक: नाशिकमधील शाळा आणि बससेवा आज सुरु करण्यात आल्या आहेत. पण खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे. काल नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता तणाव निवळल्यामुळे बससेवा सुरु करण्याचा प्रशासनानं निर्णय घेतला आहे.
रविवारी नाशिकच्या तळेगावात चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जिल्ह्यात तणावाचं वातावरण होतं. तसंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात असल्याने नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सुरु करण्यात आलेली सेवा पुन्हा बंद करण्यात आली. ती अद्यापही सुरु करण्यात आलेली नाही. मोबाईलवरुन मोठ्या प्रमाणात अफवाचं पीक पसरत असल्यामुळे नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजून काही काळ इंटरनेट बंद असणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच इंटरनेट सेवा बंद
मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.
संबंधित बातम्या:
नाशकात बससेवा ठप्प, इंटरनेट-बिअर बारही तीन दिवस बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement