एक्स्प्लोर
Advertisement
आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिक : आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातला. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता. त्याचवेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला.
नाशिक महापालिकेने 1995 अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे.
प्रहार संघटनेच्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट शिवीगाळ करत कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला. पण शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
संबंधित बातमी : आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement