एक्स्प्लोर
Advertisement
नाशिकमध्ये हैदोस घालणारा बिबट्या 8 तासांनंतर वनविभागाच्या जाळ्यात
दिवसाढवळ्या मानवीवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण होतं. जवळपास अर्धा ते एक तास बिबट्या परिसरात फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
नाशिक : नाशिक शहरात आढळलेल्या बिबट्याला पकडण्यात 8 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आलं आहे. गंगापूर रोडवरील आर्किटेक्ट कॉलनी परिसरात बिबट्या नजरेस पडला होता. ही माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. त्यात वनविभागाचा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
VIDEO | आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या वनविभागाच्या ताब्यात | नाशिक | एबीपी माझा
नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्याने खळबळ उडाली होती. गंगापूर रोडवरील आर्किटेक्ट कॉलनी परिसरात बिबट्या नजरेस पडला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सध्या घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले.
बिबट्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याने वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. त्यात वनविभागाचा कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. उपचारासाठी कर्मचाराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परिसरात बिबट्या घुसल्याच्या बातमीनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास अडचणी येत होत्या.
मात्र दिवसाढवळ्या मानवीवस्तीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचं वातावरण होतं. जवळपास अर्धा ते एक तास बिबट्या परिसरात फिरत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
पुणे
Advertisement