नाशिक महापालिकेत 35 जागा ओबीसींसाठी राखीव राहणार, सर्वाधिक जागा महिलांसाठी राखीव
Obc Political Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीत देखील 27 टक्के आरक्षण लागू झाले आहे.
Obc Political Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीत देखील 27 टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेत 35 टक्के जागा ओबीसींसाठी राखीव असणार आहे.
नाशिक महापालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. या आधी प्रभाग रचना, मतदार यादी, महिला आरक्षण सोडत आदी कामे करण्यात आली आहेत. तर नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत महत्वाचा निकाल दिल्याने या निवडणुकीला देखील हे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे आता 27 टक्के जागांवर ओबीसी राखीव असणार आहे.
नाशिक महापालिकेची ओबीसी आरक्षणाची सोडत 29 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. 27 टक्के ओबीसी आरक्षण राहणार असल्यामुळे 133 मधून 27 टक्के म्हणजे 35.91% होतात, मात्र पूर्णांक न घेता जागा सोडण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यामुळे 35 जागा ओबीसी साठी राखीव करण्यात येणार आहे. दरम्यान शालिमार येथील महापालिकेच्या कवी कालिदास कला मंदिर मध्ये सकाळी अकरा वाजता महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत निघणार आहे, अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली.
नाशिक महापालिका एकूण 133 जागांवर निवडणूक होत आहे. यापैकी खुल्या 104 जागापैकी ओबीसींच्या काेट्यात 35 जागा येणार आहे. त्यात पुरूषांसाठी 17 जागा तर 18 जागा महिलांसाठी आरक्षीत हाेणार असल्याने महिला आघाडीवर आहेत. एकुण 133 जागापैकी पुरूष 66 तर महिलांसाठी 67 आरक्षित हाेत असल्याने या निवडणुकीत महिलांनीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेवर महिलराज असणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Raosaheb danve : राजा मतपेटीतून जन्माला येतो, पोटातून नाही; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
RBI on Bombay HC: नव्या चनली नोटा नेत्रहीनांचं हित नजरेसमोर ठेवत बनवलेल्या, नॅबच्या याचिकेवर उत्तर देताना आरबीआयची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
Maharashtra News : मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयात पदभरती सुरू, पदांमध्ये बाहेरील व्यक्तींना मोठी संधी मिळण्याची शक्यता