एक्स्प्लोर
LIVE: नाशिकमधील दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुंळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत.
नाशिक: नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरीत 193 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलिमीटर तर सुरगण्यात 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुंळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत.
पाण्यात वाहून गेलेल्या वस्तू वाचवताना लोकांची अक्षरश: तारांबळ उडाली.
- दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 हजार क्युसेक पाण्याच विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गोदावरीत गटाराचं पाणी
नाशिक शहरातही सकाळपासून संततधार सुरुच आहे. दुसरीकडे गोदावरीच्या नदीत गटाराचं पाणी शिरल्यानं गोदेचं पाणी प्रदूषित झालं आहे. नाशिक शहरातील गटारी आणि नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रात मिसळल्याचं चित्र आहे. यामुळे रामकुंड आणि गोदावरी नदीकिनारी पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. गोदावरी नदीतल्या दुतोंड्या मारूतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं आहे.
घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद
नाशिक जिल्ह्यातल्या घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. देवळे पुलाला भगदाड पडल्यामुळे वाहतूक रोखण्यात आली आहे. तहसिलदारांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
वाहनं रोखण्यात आल्यानं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.
वाहून जाणारी कार बाहेर काढली
नाशिकमध्ये गाडगे महाराज पुलाजवळ एक कार पुराच्या पाण्यात वाहून जात होती. या परिसरात पूरसदृश्य स्थिती झाली होती. यातच कार वाहून जात होती. पण स्थानिकांच्या अथक प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात आली आहे.
युवासेनेचं आंदोलन
नाशिकमध्ये मुसळधार पावसानं जागोजागी पाणी साचलं आहे. त्यामुळे युवा सेनेनं अनोखं आंदोलन केलं.
पाणी तुंबलंय त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस वॉटर पार्क नावाचा बॅनर लावला आणि त्याच पाण्यात पोहून आंदोलन केलं.
शिर्डीतही पावसाचं पुनरागमन
तर तिकडे, शिर्डीतही काही दिवस दडी मारल्यानंतर पावसानं पुनरागमन केलं. भंडारधरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाच्या भात शेतीच्या दुबार पेरणीचं संकट टळलं.
संगमनेर, अकोले भागात मुसळधार तर श्रीरामपूर, शिर्डी, राहता परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement