एक्स्प्लोर
नाशिकमध्ये बाल्कनीतून पडून 5 वर्षीय चिमुकलीचा जीव गेला!
नाशिक : नाशिकमधील सिडको परिसरात राहणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीचा घराच्या बाल्कनीत खेळत असताना तोल गेल्याने खाली पडून मृत्यू झाला. वावरेनगर परिसरातील लक्ष्मी निवासमधील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वावरेनगर परिसरातील गुरुदत्त धोंगडे नामक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राहतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांची मुलगी देवयानी ही घरातील बाल्कनीत खेळत होती. खेळत असताना अचानक तिचा तोल गेला आणि बाल्कनीच्या दरवाजाला तिची जोरदार धड़क होऊन डोक्याला जबर मार लागल्याने ती बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळली. हे बघताच वडिलांनी तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपचार सुरु होण्यापूर्वीच तपासणी दरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अंबड पोलिस स्टेशनला याबाबत अकस्मात् मृत्यूची नोंद करण्यात आली असून तिच्या निधनाची बातमी समजताच परिसरावर शोककळा पसरली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement