एक्स्प्लोर

‘बॉश’च्या नाशिकमधील कंपनीला 10 कोंटींचा गंडा

विशेष म्हणजे कंपनीतीलच एक कॉन्ट्रक्टर यातील सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहे.

नाशिक : भारतातील उद्योगक्षेत्रात मोठं नाव असलेल्या नाशिकमधील बॉश कंपनीची तब्बल 10 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. स्पेअर पार्ट्सची चोरी करत, तसेच कंपनीच्या नावे बनावट स्पेअर पार्ट्स तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचाच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उद्योगक्षेत्रात यामुळे खळबळ उडाली. वाहनांचे स्पेअर पार्ट्स बनवण्यात अग्रेसर असलेल्या नाशिकच्या बॉश कंपनीतून कच्चा माल परस्पर बाहेर नेऊन या मालापासून बनावट स्पेअर पार्ट तयार केले जात होते. बॉश कंपनीच्या नावे विकणाऱ्या एका टोळीच्या अंबड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिश अहमद हुसैन खान आणि अहमद रजा शुभराजी खान यांना अटक केली आहे. बॉश कंपनीच्या जवळच असलेल्या पंडित कॉलनी परिसरात एका तीन मजली इमारतीमध्ये हे बनावट स्पेअर पार्ट तयार केले जात होते. ट्रकमधून हा माल बाजारात जात असताना पोलिसांनी छापा मारुन डिझेलच्या गाड्यांसाठी लागणारे नोझल, नीडल्स, व्हॉल्व सेट, पिस्टन असा एकूण 23 टन माल आणि 2 वाहनं जप्त केली आहेत. विशेष म्हणजे कंपनीतीलच एक कॉन्ट्रक्टर यातील सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहे. गेल्या पाच वर्षात बॉश कंपनीमध्ये चोरीच्या पाच घटना समोर आल्या असून, आजपर्यंत याबाबत 4 गुन्हे दाखल झाले आहेत आणि आता ही घटना समोर आल्याने कंपनी प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहेत. आता बॉश कंपनीने आपली अंतर्गत सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून अशाप्रकारे कामं करणार एक मोठ रकेटच शहरात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा माल नेमका कोण विकत घेतो आणि कुठे विकला जातोय याचा पोलिस शोध घेत आहेत. हा सर्व मुद्देमाल पकडून 5 दिवसांनंतर अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल का केला असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच या प्रकारामुळे उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
युवकाचं लग्न सुरू असतानाचा पहिल्या पत्नीची एन्ट्री, नवरदेवाला चोप; लग्नसोहळ्यात पिच्चरटाईप गोंधळ
Eknath Shinde Nashik: 'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची; राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म अन् संस्कृतीचा पाया मजबूत हवा' : एकनाथ शिंदे
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...
मालेगावच्या उपमहापौरांनी एक महिन्यानंतर कार्यालय उघडलं; शान-ए-हिंद यांनी टिपू सुलतान यांचा फोटो हटवला, पण...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
Embed widget