ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिककरांना झटका, चार शहरांसाठीची विमान सेवा बंद होणार
Alliance Air: नाशिककरांसाठी दिवाळीच्या तोंडावर अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. कारण नाशिकहून आता चार शहरांसाठीची विमान सेवा बंद होणार आहे.
Alliance Air: नाशिककरांसाठी दिवाळीच्या तोंडावर अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. कारण नाशिकहून आता चार शहरांसाठीची विमान सेवा बंद होणार आहे. अलायन्स एअर या कंपनीने तशी घोषणा केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीच्या वतीने केंद्र सरकारच्या उड्डाण या योजनेअंतर्गत सेवा दिली जात आहे. आता दिवाळीतच सेवा बंद होत आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोळीला सामोरे जावे लागणार आहे. ज्या शहरांमध्ये विमानतळ आहे, पण तेथे प्रवास विमान सेवा दिली जात नाही, अशा शहरांसाठी केंद्र सरकारने उडान ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत नाशिक मधील ओझर विमानतळावरून विमानसेवा सुरु झाली. या योजनेच्या माध्यमातून अलायन्स इंडिया कंपनीने सेवा सुरू केली.
नाशिकहून पुणे अहमदाबाद आणि हैद्राबाद यातील शहरांसाठी प्रारंभी सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर हैदराबाद सेवा बंद करण्यात आली. मात्र कंपनीने अहमदाबाद आणि पुणे ही सेवा अतिशय उत्तम पद्धतीने सुरु ठेवली. त्या प्रवाशांचा मोठ्या प्रतिसादही लाभला. यानंतर कंपनी नाशिकहून -अहमदाबाद मार्गे दिल्ली आणि नाशिक-पुणे मार्गे बेळगाव या शहरांसाठी सेवा दिली. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने प्रवासी कंपनीच्या सेवांचा लाभ घेत आहेत. असे असतानाच आता केंद्र सरकारच्या उडान योजनेचा कालावधी संपत असल्याने अखेर या सेवा बंद होत आहेत. कंपनीला तसे पत्र विमानतळ प्रशासन असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एचएएलने दिले आहे.
दरम्यान, येत्या 31 सप्टेंबरपासून कंपनीच्या नाशिक-पुणे, नाशिक-अहमदाबाद, नाशिक- अहमदाबाद-दिल्ली आणि नाशिक -पुणे-बेळगाव या सेवा बंद होणार आहेत. दरम्यान सेवा बंद होत असल्याची माहिती मिळताच खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाशी संपर्क केला. विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उडाण योजना आहे. ती कायमस्वरूपी देता येणार नाही या योजनेद्वारे संबंधित शहरात विमान सेवा सुरू राहू शकते की नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्या व्यावसायिक पद्धतीने त्या-त्या शहरात सेवा सुरू असते, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अलायन्सद्वारे दिल्या जाणाऱ्या शहरांसाठी अन्य विमान कंपन्यांनी सेवा द्यावी, असे पत्र एचएएल प्रशासनाने विमान कंपन्यांना दिले आहे. त्यास प्रतिसाद मिळण्याची आशा आहे. तर या संदर्भात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी जातीन लक्ष घालून विमान सेवा कार्यान्वित करावी, अशी मागणी नाशिकच्या उद्योग, व्यवसाय, पर्यटन आणि यांनी क्षेत्रातून होत आहे.