Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी केले स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन; फुलांची उधळण करत ठाकरेंचे स्वागत
Nashik News : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Uddhav Thackeray Nashik Visit नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.
काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये (Nashik News) आगमन झाले आहे. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. नाशिक विमानतळावर त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह नाशिकमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला अभिवादन
त्यानंतर उद्धव ठाकरे हे भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेले. मात्र त्याआधी त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
उद्धव ठाकरेंचे अनेक ठिकाणी जंगी स्वागत
दरम्यान, उध्दव ठाकरे यांचे ओझर विमानतळ ते भगूर दरम्यान अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. 25 फुटांचे हार घालण्यात आले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळाराम मंदिराचे घेणार दर्शन
आज अयोद्धेत प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय. ठाकरे गट आज काळाराम मंदिरात श्रीरामाची पूजा आणि महाआरती करेल. उद्या अधिवेशन होणार आहे. आज सायंकाळी काळाराम मंदिर आणि गोदा आरतीला जातील, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली आहे.
'रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ' प्रदर्शनाचे उदघाटन
उद्धव ठाकरेंच्या यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. त्या डेमोक्रेसी हॉटेल परिसरातच 'रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ' या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये बाबरी मशीदचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरेंची त्याबाबतची भूमिका याबाबत माहिती देणारे होर्डिंग, चित्रफीत तर आहेच मात्र त्यासोबतच भाजपवरही होर्डिंग्सच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे.
आणखी वाचा