Nashik Politics : नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, महानगर प्रमुखांसह दोघांना दीड वर्षांची शिक्षा
Nashik Politics : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधागड बडगुजर अडचणीत सापडले आहेत.
Nashik Politics : नाशिकच्या (Nashik) राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. वर्ष 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी (Loksabha Election) शासकीय कामात अडथळा आणि सहायक पोलिस आयुक्ताला अरेरावी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांच्यासह तिघांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे (Udhhav Thackeray) नाशिकचे महानगर प्रमुख सुधागड बडगुजर अडचणीत सापडले आहेत. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह ज्ञानेश्वर वासुदेव बडगुजर आणि राकेश निंबा शिरसाठ यांना दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने सुधाकर बडगुजर आणि इतर दोन जणांवर कारवाई केली आहे.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सन 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान या तिन्ही संशयतांच्या वाहनास शस्त्र आढळून आली होती. याची विचारपूस करताना तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त आणि अंबड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्या कामात अडथळा आणल्या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता फेब्रुवारी 2023 प्रकरण निकाल लागले असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह दोन जणांना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात ही सर्वात मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि इतर दोघांविरुद्ध हा गुन्हा सिद्ध झाला असून कलम 353 प्रमाणे एक वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 5000 रुपयांचा दंड तसेच कलम 37 आणि 135 प्रमाणे सहा महिने कारावासाने प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील रवींद्र निकम यांनी दिली घटना घडली. त्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याचे एकूण 13 गुन्हे दाखल झाले होते. या इतर गुन्ह्यातील हे सर्व निर्दोष सुटले आणि आम्हाला शिक्षा झाली असल्यास दावा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आले आहे. नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी दत्ता गायकवाड यांनी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची माहिती दिली असून आता दरम्यान या निकालाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
बडगुजर यांना जामीन मंजूर
शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना 1 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी संशयास्पद गाडी पकडली होती .त्यावेळी गाडी सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी बडगुजर यांच्यासह तिघांना शिक्षा सुनावली. ज्या उमेदवारच्या प्रचारादरम्यान शिक्षा झाली, ते हेमंत गोडसे शिवसेना सोडून शिंदें गटात दाखल झाले आहेत. दरम्यान या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांना जामीन मंजूर झाला असून न्याय मागण्यांसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी म्हटले आहे.