Sharad Pawar : पीएम मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले...
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना शेतकऱ्याने कांद्यावर बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती. आता शरद पवारांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.
![Sharad Pawar : पीएम मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले... Sharad Pawar praises kiran Sanap who raised slogans on the onion issue at PM Narendra Modi s campaign rally in Nashik Maharashtra Marathi News Sharad Pawar : पीएम मोदींच्या सभेत घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/16/c2ac27c9a97795ec595034377f7dce151715836135302923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Pawar नाशिक : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीर सभा नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना शेतकऱ्याने कांद्यावर (Onion) बोला असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्याकडून कांद्यावर बोला, असे म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी किरण सानप (Kiran Sanap) या तरुणाला ताब्यात घेतले. नरेंद्र मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा कार्यकर्ता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा असल्याचे समोर आले आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. किरण सानप हा गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत आहे.
घोषणाबाजी करणाऱ्या तरुणाचे शरद पवारांकडून कौतुक
यावर शरद पवार म्हणाले की, मोदींना कांद्यावर बोला असे तरुण शेतकर्यांनी प्रश्न विचारला तर तो योग्यच आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. किरण सानप हा माझ्या पक्षाचा आहे का तर माहीत नाही. मात्र असेल तर त्याचा मला अभिमान आहे. या शब्दात शरद पवार यांनी मोदींना कांद्यावर बोला हे विचारणाऱ्या तरुणाचे कौतुक केले आहे.
कांदा प्रश्नावर काय म्हणाले पीएम मोदी?
शेतकऱ्याच्या घोषणाबाजीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले की, कांदा स्टॉक करण्याचे काम आमच्याकडून सुरु करण्यात आले आहे. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही आतापर्यंत खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदानदेखील दिले आहे.
कांदाप्रश्नी भुजबळांचे पीएम मोदींना पत्र
कांदाप्रश्नी मंत्री छगन भुजबळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले आहे. केंद्र सरकारच्या (Central Government) कांदा निर्यातीबाबतच्या (Onion Export) धोरणामुळे राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Rohit Pawar : 'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)