Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज सहा लोकसभा मतदारसंघात नेमका कुणाला पाठींबा देणार? समोर आली मोठी अपडेट
Shantigiri Maharaj : सहा लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज नेमकं कोणत्या उमेदवाराला पाठींबा देणार? याबाबत आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यांची भूमिका काय असणार? याबाबत मोठी अपडेट समोर आलीय.
Shantigiri Maharaj : सहा लोकसभा मतदारसंघासाठी शांतीगिरी महाराज आज अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) मुहूर्तावर दुपारी तीन वाजता नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, शिर्डी, धुळे आणि दिंडोरी या सहा लोकसभेत महाराजांचा कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शांतीगिरी महाराज नेमकी काय भूमिका घेणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मागील काही दिवसात अनेक राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली आहे. आज शांतीगिरी महाराज काय घोषणा करतात याकडे भक्त परिवाराचे लक्ष लागले आहे. तसेच बाबाजी भक्त परिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार? याबाबतची चर्चा आता रंगली आहे.
शांतीगिरी महाराज कुणाला पाठींबा देणार?
आता याबाबत मोठी अपडेट समोर येत असून शांतीगिरी महाराजांचा कोणालाही पाठिंबा देणार नाही. शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शांतिगिरी महाराज यांचा महाराज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर, धुळे यासह आठ मतदारसंघात मोठा भक्त परिवार आहे. शांतिगिरी महाराज यांचा पाठिंबा मिळावा यासाठी संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नुकतीच महाराजांची भेट घेतली होती. मात्र शांतीगिरी महाराज कुणालाही पाठींबा जाहीर करणार नाहीत, अशी माहिती मिळत आहे.
शांतीगिरी महाराज - छगन भुजबळ भेट
दरम्यान, शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळांच्या भेटीनंतर शांतीगिरी महाराज म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मतदारांना आम्ही भेटत असतो. ते कर्तव्य आहे. छगन भुजबळ यांची आज भेट घेतली. त्यांना आमची निशाणी बादली भेट दिली. यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांना आमची मदत करण्याची इच्छा आहे. त्यांच्या मदतीबाबत मी बोलू शकत नाही. उमेदवाराचे कर्तव्य असतं भेटीगाठी घेणे. आमचे नातेसंबंध असतात त्यांच्याकडे आम्ही जातो. दिनकर पाटील, छगन भुजबळ यांच्याशी आमचे नाते आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
लढणार अन् जिंकणार! शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लोकसभा लढवणार, महायुतीच्या अडचणी वाढल्या